४.९४ लाख शिक्षक पदांना अखेर संचमान्यता मंजुरी; ३,६०६ पदे नामंजूर, तर ४,३९४ पदे रखडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 05:48 IST2026-03-07T05:47:49+5:302026-03-07T05:48:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात ४ लाख ९४ हजार ६८२ पदांना संचमान्यता मंजूर करण्यात आली आहे. तर ३,६०६ ...

4.94 lakh teacher posts finally approved; 3,606 posts rejected, 4,394 posts delayed | ४.९४ लाख शिक्षक पदांना अखेर संचमान्यता मंजुरी; ३,६०६ पदे नामंजूर, तर ४,३९४ पदे रखडली

४.९४ लाख शिक्षक पदांना अखेर संचमान्यता मंजुरी; ३,६०६ पदे नामंजूर, तर ४,३९४ पदे रखडली

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात ४ लाख ९४ हजार ६८२ पदांना संचमान्यता मंजूर करण्यात आली आहे. तर ३,६०६ पदे नामंजूर करण्यात आली आहेत. तर ४,३१५ पदांची प्रक्रिया प्रलंबित आहे. माध्यमिक शिक्षण संचालकांनी ४ मार्चला याबाबत आदेश देत ही सर्व माहिती पहिल्यांदा शालार्थ पोर्टलवर  सर्व सामान्यांसाठी खुली केली आहे.

२००५ च्या माहिती अधिकार कायद्यानुसार संचमान्यता माहिती जाहीर अपेक्षित होती. २१ वर्षांनी माध्यमिक शिक्षण संचालकांनी मंजूर-नामंजूर पदांची अद्ययावत माहिती सरकारी शालार्थ पोर्टलवर दिली; याचे काहींनी स्वागत, तर काही शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली. 

राज्यात एकूण ५,१०,४८६ शिक्षक पदांपैकी ४,९४,६८२ शिक्षक पदांना संचमान्यता दिली आहे. अद्याप ४,३९४ पदांची अधिकृत जुळणी बाकी असून ७,९३७ पदांची जुळणीसंबंधित माहिती वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आली आहे. तर ३,६०६ पदे अमान्य केली असल्याची माहिती ६ मार्चला शिक्षण 
विभागाने दिली.

माहिती गोपनीय, निर्णयाचा फेरविचार करावा
प्रत्येक शाळेमध्ये शिक्षण विभागाने मंजूर केलेली पदे दहा असतील आणि जर त्यापेक्षा अधिक शिक्षक संख्या असेल तर जुळणी (मॅपिंग) करताना अधिकच्या पदांना नाकारले जाते.  ही महिती सार्वजनिक करणे हा निर्णय स्वागतार्ह आहे, असे मुख्याध्यापक संघटनेचे माजी उपाध्यक्ष महेंद्र गणपुले यांनी सांगितले. तर ही माहिती गोपनीय आहे. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करावा, असे पुरोगामी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे यांनी सांगितले.

मंजूर शिक्षक पदांची जिल्ह्यांमधील आकडेवारी
    पुणे     ३०,८३३
    नाशिक     २८,३९१
    अहिल्यानगर     २५,६६६
    सोलापूर     २४,६०७
    जळगाव     २३,००१
    संभाजीनगर     २१,९३३
उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये जुळणी होऊन मान्यता दिलेल्या पदांची संख्या २०  हजार पेक्षा कमी संख्येने आहे.

Web Title : 4.94 लाख शिक्षक पदों को मंजूरी; कुछ अस्वीकृत, कुछ लंबित

Web Summary : महाराष्ट्र ने 4.94 लाख शिक्षक पदों को मंजूरी दी, 3,606 को अस्वीकार कर दिया। 4,315 पद अभी भी लंबित हैं। यह जानकारी अब शालार्थ पोर्टल पर सार्वजनिक है, इस कदम का शिक्षकों से मिली-जुली प्रतिक्रिया मिली।

Web Title : 4.94 Lakh Teacher Posts Approved; Some Rejected, Others Pending

Web Summary : Maharashtra approves 4.94 lakh teacher posts, rejects 3,606. 4,315 positions remain pending. The information is now public on the Shalarath portal, a move met with mixed reactions from educators.

टॅग्स :Teacherशिक्षक