शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
2
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
3
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
4
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
5
Rekha Jhunjhunwala यांच्या संपत्तीत 'या' एका शेअरनं लावला सुरुंग; महिन्याभरात संपत्तीत ₹२३०० कोटींची घट
6
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
7
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
8
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
9
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
10
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
11
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
12
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
13
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
14
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
15
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
16
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
17
पूर्वेकडचे लोक चिनी, दक्षिणेतील आफ्रिकींसारखे; सॅम पित्रोदा यांचे वादग्रस्त उद्गार; काँग्रेसने घेतला राजीनामा
18
राज्यात लोकसभेनंतर रंगणार शिक्षक, पदवीधर निवडणूक; १० जूनला मतदान, १३ जूनला निकाल
19
महिनाभरात २२ लाख वाहनांची विक्री; २७ टक्के वाढ;  देशभरातील खरेदीदारांमध्ये प्रचंड उत्साह
20
टेनिस बॉल क्रिकेटमधून शिकलो ‘सुपला शॉट’; सूर्यकुमार यादवने सांगितली आठवण; आपसूक मारला जातो हा फटका

राज्यात ४५ लाख बेरोजगार : माहिती अधिकारात उघड 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2019 12:19 PM

याशिवाय नोंदणी न झालेले आणखी काही लाख बेरोजगार असतील ते वेगळेच!

ठळक मुद्देएनएसयुआय करणार आंदोलन

पुणे : राज्यातील बेरोजगारांची एकूण अधिकृत संख्या ४५ लाख १ हजार ४२६ इतकी आहे. काँग्रेस प्रणित एनएसयूआय या विद्यार्थी संघटनेने माहितीच्या अधिकाराखाली केलेल्या अर्जाला सरकारी कार्यालयाने दिलेल्या उत्तरातून ही संख्या उघड झाली. याशिवाय नोंदणी न झालेले आणखी काही लाख बेरोजगार असतील ते वेगळेच!एनएसयूआयचे प्रदेश अध्यक्ष अमीर शेख यांनी ही माहिती दिली. माहितीच्या अधिकारात त्यांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता संचलनालय, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे अर्ज केला होता. त्यात त्यांनी राज्यातील नोंदणीकृत बेरोजगारांच्या संख्येची मागणी केली होती. त्याप्रमाणे या सरकारी विभागाने त्यांना बेरोजगारांची संख्या ४५ लाख असल्याचे कळवले आहे.शेख म्हणाले, ही परिस्थिती भयावह आहे. यापूर्वी कधीही इतक्या मोठ्या संख्येने बेरोजगार नव्हते. यात भर म्हणून लाखो लोकांच्या असलेल्या नोकऱ्या  जात आहेत. या बेरोजगारीच्या विरोधात सरकार काहीही पावले उचलायला तयार नाही. वास्तविक नोंदणी झालेल्यांना नोकऱ्या मिळवून देणे, त्यासाठी  विविध क्षेत्रांबरोबर सतत संपर्कात राहणे ही संबधित खात्याची जबाबदारी आहे.मात्र ते ही जबाबदारी पार पाडत नाहीत. रोजगार हा प्रत्येकाचा हक्क आहे व सरकार त्याकडे दुर्लक्ष करते आहे. नवे उद्योग यावेत, त्यातून नोकऱ्या निर्माण व्हाव्यात यासाठी सरकार काहीच करायला तयार नाही. हे असेच सुरू राहिले तर येत्या काही वर्षात सर्वसामान्यांचे जगणे अवघड होईल. त्यामुळे युवकांच्या या प्रश्नाची दखल घेत एनएसआय सरकारच्या विरोधात युवकांचे संघटन उभे करेल. सध्या प्रत्येक जिल्ह्यात संघटना एक आंदोलनक करेल असा इशाराही शेख यांनी दिला.

टॅग्स :Puneपुणेjobनोकरीbusinessव्यवसायState Governmentराज्य सरकार