राज्यात रब्बीच्या ३४ लाख हेक्टरवरील पेरण्या उरकल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 07:55 PM2019-12-20T19:55:08+5:302019-12-20T19:57:54+5:30

ज्वारी, हरभऱ्याच्या पेरणीला वेग : तूर, कापसावर रोग आणि अळीचा प्रादुर्भाव

34 lakh hectares rabbi crops Sowing is completed in the state | राज्यात रब्बीच्या ३४ लाख हेक्टरवरील पेरण्या उरकल्या

राज्यात रब्बीच्या ३४ लाख हेक्टरवरील पेरण्या उरकल्या

Next
ठळक मुद्देकार्यशाळा, गावबैठका आणि एसएमएसद्वारे शेतकऱ्यांना सल्ले दणे अशा उपाययोजनाकापसावर गुलाबी बोंड अळी व रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव

पुणे : राज्यात रब्बीच्या ३४ लाख ५९ हजार हेक्टरवरील (६०.५९ टक्के) पेरण्या उरकल्या असून, रब्बी ज्वारी, हरभरा, गहू आणि मक्याच्या पेरणीने वेग घेतला आहे. कोकण आणि पुणे विभाग वगळता उर्वरीत ठिकाणी गुलाबी बोंड अळी, रस शोषणारी कीड, तूर पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. 
रब्बी पिकाचे सरासरी क्षेत्र ५६ लाख ९३ हजार ६५ हेक्टर असून, पैकी ३४ लाख ४९ हजार २४१ हेक्टरवरील पेरणीची कामे झाली आहेत. ज्वारी पिक पोटरीच्या अवस्थेत असून, पिकांमधे आंतरमशागतीची कामे सुरु आहेत. रब्बी ज्वारीचे सरासरी क्षेत्र २६ लाख ७८ हजार ५१३ हेक्टर असून, १४ लाख ६६ हजार ९९७ हेक्टरवरील पेरणीची कामे (५५ टक्के) झाली आहेत. गव्हाचे सरासरी क्षेत्र १० लाख १४ हजार ८०४ हेक्टर पैकी ४ लाख ३० हजार ६६३, मक्याची २ लाख २५ हजार २६० हेक्टरपैकी १ लाख ७ हजार ४९८ हेक्टरवरील पेरणीची कामे झाली आहेत. 
हरभºयाचे सरासरी क्षेत्र १४ लाख ९० हजार २४७ हेक्टर असून, १३ लाख ४० हजार ३६१ हेक्टरवरील (९० टक्के) व कडधान्याचे सरासरी क्षेत्र १ लाख ९ हजार ९६८ हेक्टर असून, ७५ हजार २४३ हेक्टरवर (६८ टक्के) पेरणी झाली आहे. करडईची ८७ हजार ६०४ पैकी १६ हजार १६६, जवसाची २१ हजार ५०४ पैकी ५ हजार १२० (२४ टक्के) हेक्टरवरील पेरणीची कामे झाली आहेत. 
कोकण आणि पुणे वगळता राज्यात विविध ठिकाणी रोग आणि किडीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. कापसावर गुलाबी बोंड अळी व रस शोषणाऱ्याकिडींचा प्रादुर्भाव झाला आहे. तूर पिकावर हेलीकोव्हर्पा, पानफुलांना जाळे करणारी अळी, शेंगमाशी व शेंगा पोखरणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित ठिकाणी कृषी विद्यापीठाकडून पीक संरक्षण सल्ले देण्यात येत आहे. फेरोमेन सापळे, ल्युअर्सचा पुरवठा, बाधीत क्षेत्रास तज्ज्ञांच्या भेटी, जनजागृती कार्यशाळा, गावबैठका आणि एसएमएसद्वारे शेतकऱ्यांना सल्ले दणे अशा उपाययोजना करण्यात येत असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. 

Web Title: 34 lakh hectares rabbi crops Sowing is completed in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.