आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 22:27 IST2025-05-14T22:24:55+5:302025-05-14T22:27:36+5:30
Sex Racket Busted In Palghar: पालघरमध्ये सेक्स रॅकेट चालवणाऱ्या ३० वर्षीय महिलेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
अर्नाळा सागरी पोलिसांनी पालघर जिल्ह्यात वेश्याव्यवसाय चालवल्याच्या आणि तरुणींना देहव्यापारात भाग पाडल्याच्या आरोपाखाली ३० वर्षीय महिलेला अटक केली. भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) कायदा, १९५६ च्या विविध संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १३ मे २०२५ रोजी नालासोपारा (पश्चिम) येथील दक्ष फार्म हाऊसवर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
आफरीन सावल सलीम असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन महिलांची सुटका केली, ज्या वसई-विरार परिसरात राहतात. मिळालेल्या माहितीनुसार, आफरीन पीडितांचे फोटो ग्राहकांना पाठवायची. त्यानंतर ग्राहक पीडितांना स्थानिक लॉज किंवा फार्महाऊसमध्ये नेऊन त्यांच्यावर अत्याचार करायचे. यासाठी पाडितांना १५०० ते ३००० रुपये दिले जायचे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.