शहरं
Join us  
Trending Stories
1
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
4
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
5
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
6
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
7
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
8
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
9
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
10
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
11
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
12
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
13
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
14
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
15
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
16
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
17
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
18
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा

त्या ५० वर्षीय रामभाऊंनी चक्क मृतदेह पाठीवर घेऊन बाहेर आणला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 10:19 AM

कंदरमधील ते १९ जण ठरले पूरग्रस्तांचे देवदूत; मच्छिमारांनी केली दहा हजार लोकांना मदत

ठळक मुद्देसांगली,कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यात महाभयंकर पूरस्थिती निर्माण झाली होतीस्वत:च्या १२ बोटींतून  तब्बल  पाच दिवस अथक परिश्रम करून  सुरक्षित स्थळी नेण्याचे काम कंदरच्या १९ मच्छीमार बांधवांनी केलेया आपत्तीच्या काळात मदतीला जाणारे हे मच्छीमार बांधव पूरग्रस्त बांधवांसाठी देवदूतच ठरले.

नासीर कबीर

करमाळा :  सांगलीत मदतकार्य  करणारे कंदर येथील पन्नासवर्षीय रामभाऊ चव्हाण यांनी पाण्यात वेढलेल्या इमारतीमधून शेकडो पूरग्रस्तांना चक्क पाठीवर बसवून बोटीत बसविले. एका ठिकाणी तर एका व्यक्तीचे निधन झाले होते ते उचलण्याचे धाडस कोणी करत नव्हते. रामभाऊंनी  त्या मृतदेहास चक्क पाठीवर घेऊन बाहेर आणले व बोटीतून स्मशानभूमीत नेले.

घरदार सोडून जिवाची पर्वा न करता दहा  हजार पूरग्रस्तांना  स्वत:च्या १२ बोटींतून  तब्बल  पाच दिवस अथक परिश्रम करून  सुरक्षित स्थळी नेण्याचे काम कंदरच्या १९ मच्छीमार बांधवांनी केले. या आपत्तीच्या काळात मदतीला जाणारे हे मच्छीमार बांधव पूरग्रस्त बांधवांसाठी देवदूतच ठरले. 

सांगली,कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यात महाभयंकर पूरस्थिती निर्माण झाली होती. पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना  प्रथमत: बाहेर काढून सुरक्षित स्थळी घेऊन जाणे हे महत्वाचे काम  प्रशासनापुढे होते. करमाळा तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांनी मच्छीमारांना पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी जाण्याचे आवाहन करताच क्षणाचाही विलंब न लावता  स्वत:च्या बोटी घेऊन करमाळा तालुक्यातील  भीमा नदीच्या पाणलोट क्षेत्रात  मासेमारी करणारे, पट्टीचे पोहणारे १९ युवक जीवावर उदार होऊन पाच दिवस मेहनत घेऊन दहा हजार पूरग्रस्तांना बोटीत बसवून सुरक्षित स्थळी नेले.

सांगली शहरातील विविध भागात पुराच्या पाण्यात अडकलेले वयोवृध्द,गंभीर आजारी,महिला,लहान मुले यांना  बोटीत बसवून सुरक्षित स्थळी घेऊन जाण्याचे काम शिवाय दुमजली, तीनमजली इमारतीमध्ये अडकलेल्या लोकांना जेवण,पाणी व जीवनावश्यक वस्तू पुरवठा करण्याचे काम  कंदर येथील रामभाऊ चव्हाण, धनाजी माने,शंकर माने,लखन चव्हाण,राहुल जाधव,सागर शिरतोडे, दशरथ बोडरे,संतोष माने,राहुल चव्हाण, दत्तात्रय चव्हाण, धनाजी माने, बंडू बोडरे,सखाराम माने,नागनाथ  माने ,सुग्रीव चमरे, नीलेश भोई, शिवाजी  चमरे, दयाराम चमरे,लहू भोई,संजय चमरे,कोंडिबा चंदर, सोमनाथ नगरे आदींनी केले.

त्या ५० वर्षीय रामभाऊंनी चक्क मृतदेह पाठीवर घेऊन बाहेर आणलासांगलीत मदतकार्य  करणारे कंदर येथील पन्नासवर्षीय रामभाऊ चव्हाण यांनी पाण्यात वेढलेल्या इमारतीमधून शेकडो पूरग्रस्तांना चक्क पाठीवर बसवून बोटीत बसविले. एका ठिकाणी तर एका व्यक्तीचे निधन झाले होते ते उचलण्याचे धाडस कोणी करत नव्हते. रामभाऊंनी  त्या मृतदेहास चक्क पाठीवर घेऊन बाहेर आणले व बोटीतून स्मशानभूमीत नेले.

टॅग्स :SolapurसोलापूरKolhapur Floodकोल्हापूर पूरSangli Floodसांगली पूरfishermanमच्छीमार