कृष्णा, घटप्रभा, मलप्रभा, वेदगंगा, दूधगंगा व हिरण्यकेशी या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 05:21 PM2019-08-05T17:21:03+5:302019-08-05T17:25:35+5:30

दोन लाखांहून अधिक क्युसेक विसर्ग : आलमट्टीच्या पाण्यामुळे नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

3 TMC water in the lid; Fear of Purchi | कृष्णा, घटप्रभा, मलप्रभा, वेदगंगा, दूधगंगा व हिरण्यकेशी या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

कृष्णा, घटप्रभा, मलप्रभा, वेदगंगा, दूधगंगा व हिरण्यकेशी या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

googlenewsNext
ठळक मुद्देविजयपूर, बागलकोट जिल्ह्यातील कृष्णा,घटप्रभा, मलप्रभा, वेदगंगा, दूधगंगा व हिरण्यकेशी या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली सध्या कृष्णेत कल्लोळजवळ दूधगंगेतून ३३०८८ तर राजापूर जलाशयातून १ लाख ७२ हजार ३० क्युसेक असे एकूण २ लाख ५ हजार ११८ क्युसेक पाणी येत आहेआलमट्टी जलाशयाचा पाणीसाठा १२३.०८ पैकी १०३.७६ टीएमसी इतका झाला आहे. पाण्याची पातळी ५१९.६० मीटरपैकी ५१८.४१ मीटर इतकी झाली

विजयपूर : विजयपूर, बागलकोट जिल्ह्यातील कृष्णा, घटप्रभा, मलप्रभा, वेदगंगा, दूधगंगा व हिरण्यकेशी या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, या नदीकाठावरील गावातील नागरिकांना अतिदक्षतेचा आदेश विजयपूर-बागलकोट  प्रांताधिकारी कार्यालयाद्वारे देण्यात आला आहे. 

कृष्णा नदीकाठावरील  कोलार,बसवन बागेवाडी, मांजरी, येडूर, कल्लोळ, इंगळी या गावांना प्रांताधिकाºयांसह विविध अधिकाºयांनी भेट दिली व परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर  प्रांताधिकाºयांनी चिकपडलसगी, तिकोटा बबलेश्वर उपविभागातील महापुराचा या आधी फटका बसलेल्या गावांना अतिदक्षतेचा इशारा दिल्याने कृष्णा नदीकाठावरील नागरिकांनी महापुराची धास्ती घेतली आहे. 

सध्या कृष्णेत कल्लोळजवळ दूधगंगेतून ३३०८८ तर राजापूर जलाशयातून १ लाख ७२ हजार ३० क्युसेक असे एकूण २ लाख ५ हजार ११८ क्युसेक पाणी येत आहे. यामुळे संथ वाहणाºया कृष्णेने रौद्ररुप धारण केले आहे. आलमट्टी जलाशयात एकूण २ लाख २२ हजार ११३ क्युसेक पाणी येत आहे. तर २ लाख ३९ हजार ५२१ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. शनिवार रोजी आश्लेषा नक्षत्राचेही दमदार पावसाच्या वाढलेल्या या जोरामुळे २००५ प्रमाणे महापूर येण्याची भीती निर्माण झाली आहे. धरणक्षेत्रात शुक्रवारी-शनिवारदेखील पावसाचे वाढलेले प्रमाण कमी न झाल्याने विजयपूर, बागलकोट जिल्ह्यामधील नद्यांनी धोक्याच्या पातळीमध्ये शिरकाव केला आहे. 

आलमट्टी जलाशयाचा पाणीसाठा १२३.०८ पैकी १०३.७६ टीएमसी इतका झाला आहे. पाण्याची पातळी ५१९.६० मीटरपैकी ५१८.४१ मीटर इतकी झाली आहे. आलमट्टी जलाशयात २ लाख ५ हजार ८३२ क्युसेक पाण्याची आवक होत असून जलाशयातून २ लाख ३० हजार २०७ क्युसेक पाण्याचा २६ दरवाजांमधून विसर्ग होत आहे. 

दरम्यान, विजयपूर जिल्हा प्रशासनातर्फे महापुराच्या प्रसंगावर मात करण्यासाठी आरडीएफच्या (जलद कृतीदल) तुकड्यांसह जलतरणपटू, होड्या याशिवाय नदीकाठी २३ बोटींची व्यवस्था केली आली आहे. 

Web Title: 3 TMC water in the lid; Fear of Purchi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.