शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील २३ जिल्ह्यांमध्ये महिलांसाठी ‘शक्तीसदन’; योजनेची उद्दिष्टे, सुविधा कोणत्या...जाणून घ्या

By समीर देशपांडे | Updated: March 24, 2026 18:18 IST

केंद्र शासनाच्या ‘मिशन शक्ती’ या योजनेतून ही केंद्रे चालवण्यात येणार

समीर देशपांडेकोल्हापूर : राज्यातील २३ जिल्ह्यांच्या ठिकाणी २९ ‘शक्तीसदन’ उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्यावतीने स्वयंसेवी संस्थांकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. केंद्र शासनाच्या ‘मिशन शक्ती’ या योजनेतून ही केंद्रे चालवण्यात येणार आहेत.शक्तीसदन योजना ही महिला व बालविकास क्षेत्रातील एक महत्त्वाची योजना आहे, जी मुख्यतः अत्याचारग्रस्त, बेघर किंवा संकटात सापडलेल्या महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी गरजू महिलांना तात्पुरता आश्रय, संरक्षण आणि पुनर्वसनाची सुविधा दिली जाते. संकटग्रस्त महिलांना सुरक्षित निवारा देणे, मानसिक, वैद्यकीय व कायदेशीर मदत उपलब्ध करून देणे, महिलांना स्वावलंबी बनवणे (कौशल्य प्रशिक्षणाद्वारे) आणि सामाजिक पुनर्वसन ही या योजनेची उद्दिष्टे आहेत.

घरगुती हिंसाचार पीडित, मानवी तस्करीतून मुक्त झालेल्या, बेघर, निराधार महिला, कुटुंबाने नाकारलेल्या महिला आणि नैसर्गिक आपत्ती किंवा संकटात अडकलेल्या महिलांना या शक्तिकेंद्रात प्राधान्य देण्यात येणार आहे.

दिल्या जाणाऱ्या सुविधासुरक्षित निवास, अन्न व मूलभूत गरजा, आरोग्यसेवा, कायदेशीर मदत, समुपदेशन, कौशल्य विकास, रोजगारासाठी मदतया जिल्ह्यात उभारण्यात येणार शक्तीसदनमुंबई शहर, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, बुलढाणा, वर्धा, गोंदिया, नंदुरबार, अहिल्यानगर, धुळे, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, जालना, परभणी, बीड, पालघर या ठिकाणी प्रत्येकी एक तर ठाणे, अमरावती, यवतमाळ, नाशिक, जळगाव, नांदेड या ठिकाणी प्रत्येकी दोन शक्तिकेंद्रे उभारण्यात येणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra to establish 'Shakti Sadan' for women in 23 districts.

Web Summary : Maharashtra will establish 29 'Shakti Sadan' centers across 23 districts for vulnerable women. These centers offer shelter, medical, legal aid, counseling, skill development, and rehabilitation under the 'Mission Shakti' scheme. Priority will be given to victims of domestic violence and human trafficking.