पुणे रेल्वे पोलिसांनी जप्त केले 2.50 कोटीचे दागिने

By Admin | Updated: January 27, 2017 17:23 IST2017-01-27T17:22:37+5:302017-01-27T17:23:30+5:30

पुणे लोहमार्ग पोलिसांनी चेन्नई एक्स्प्रेसमधून 2.50 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

2.50 crores jewelery seized by Pune railway police | पुणे रेल्वे पोलिसांनी जप्त केले 2.50 कोटीचे दागिने

पुणे रेल्वे पोलिसांनी जप्त केले 2.50 कोटीचे दागिने

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 27 -  पुणे लोहमार्ग पोलिसांनी चेन्नई एक्स्प्रेसमधून 2.50 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेले दागिने साडेआठ किलोचे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेऊन याबाबतची माहिती प्राप्तीकर विभागालाही कळवली आहे. 
 
गोविंद प्रजापती, विपुल राव आणि प्रतापसिंह राव अशी ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. हे तीन जण प्लास्टिकच्या दोन डब्यांमध्ये दागिने मुंबईतील जव्हेरी बाजारातील एका व्यापा-याकडे घेऊन जात असल्याची माहिती समोर आली आहे.  
 
26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर तपासणी सुरू असताना गोविंद प्रजापती हा संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. त्याला ताब्यात घेतले असता, लपूनछपून सोने नेले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला.  
 
 

Web Title: 2.50 crores jewelery seized by Pune railway police