शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळात राज्यातील अपघातांत २४ टक्के घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 09:38 IST

औरंगाबाद, पुण्यातील अपघाती मृत्युदरात मोठी घट.

ठळक मुद्देऔरंगाबाद, पुण्यातील अपघाती मृत्युदरात मोठी घट

अविनाश कोळी

सांगली : कोरोना काळात अनेक महिन्यांचा लॉकडाऊन व त्यामुळे घटलेली रस्त्यावरील वाहनांची संख्या अपघाताचा आलेख कमी करण्यास कारणीभूत ठरली आहे. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण तब्बल २४ टक्क्यांनी घटले आहे. त्याचबरोबर राज्यात अपघाती मृत्युदराची सर्वाधिक घट पुणे, औरंगाबाद, सिंधूदुर्ग शहरात नोंदली गेली आहे.

राज्यातील अपघाताची संख्या व त्यातील मृत्युदर कमी करण्यासाठी ‘इंटेलिजंट ट्रफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे २०१८ ते २०२० या काळातील अपघातांचे प्रमाण काही प्रमाणात घटत होते. कोरोना काळात मोठा लॉकडाऊन लागल्याने राज्यातील अपघातांच्या प्रमाणात अभूतपूर्व घट नोंदली गेली. 

चार जिल्ह्यात ३० टक्के अपघातपुणे, सोलापूर, अहमदनगर व नाशिक या चार जिल्ह्यांतील अपघातांची संख्या राज्यातील एकूण अपघातात ३० टक्के इतकी आहे. दुसरीकडे २०२० मध्ये झालेल्या एकूण अपघाती मृत्यूमध्ये २६ टक्के म्हणजेच एकूण ३ हजार ३६ मृत्यू नाशिक ग्रामीण (८०१) , पुणे ग्रामीण (६९६), अहमदनगर (६४२), जळगाव (४७२), सोलापूर ग्रामीण (४२५) या भागात नोंदले गेले.

अनलॉक होताच पुन्हा वाढलॉकडाऊनमध्ये अपघातांच्या प्रमाणात मोठी घट झालेली असताना अनलॉक काळात मात्र अपघातांचे प्रमाण अचानक वाढल्याचे दिसत आहे. डिसेंबर २०२० या एकाच महिन्यात राज्यात ३०७२ अपघात व १ हजार ४६२ मृत्यू नोंदले गेले. याउलट एप्रिल २०२० या महिन्यात सर्वांत कमी ५७२ अपघात व ३०३ मृत्यू नोंदले गेले आहेत.

                                २०१९      २०२०      घट %एकूण अपघात        ३२,९२५     २४,९७१     २४मृत्यू                        १२,७८८      ११,५६९    १०गंभीर अपघात         १२,१९७     ९,०९४      २५किरकोळ दुखापत    ५,४७३     ३,४३२      ३७

टॅग्स :AccidentअपघातMaharashtraमहाराष्ट्रcorona virusकोरोना वायरस बातम्या