महाराष्ट्रातील २२% मुलींच्या डोक्यावर वयाच्या २० व्या वर्षांपूर्वीच अक्षता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 09:11 IST2025-09-06T09:03:05+5:302025-09-06T09:11:51+5:30

महाराष्ट्रातील ग्रामीण भागात २५.६ टक्के मुलींच्या डोक्यावर वयाचे १८ ते २० वर्ष होताच अक्षता टाकल्या जात आहेत.

22% of girls in Maharashtra have baldness before the age of 20 | महाराष्ट्रातील २२% मुलींच्या डोक्यावर वयाच्या २० व्या वर्षांपूर्वीच अक्षता

महाराष्ट्रातील २२% मुलींच्या डोक्यावर वयाच्या २० व्या वर्षांपूर्वीच अक्षता

चंद्रकांत दडस
लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुलगी शिकली पाहिजे, तिने नोकरी केली पाहिजे, करीअरमध्ये भरारी  घेतली पाहिजे अशा गावगप्पा सारेच रंगवतात... पण ते प्रत्यक्षात येत नाही, याचे वास्तव आकडेवारीतून समोर आले आहे. महाराष्ट्रातील २२.१ टक्के मुलींचे लग्न २० वर्षांपूर्वीच आटोपले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यातही १.१ टक्के मुलींचे बालविवाह होत असून, त्याचे प्रमाण ग्रामीण भागात अधिक आहे. 

महाराष्ट्रातील ग्रामीण भागात २५.६ टक्के मुलींच्या डोक्यावर वयाचे १८ ते २० वर्ष होताच अक्षता टाकल्या जात आहेत. शहरी भागात हेच प्रमाण १५.६ टक्के आहे. रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाच्या २०२३ च्या नमुना नोंदणी प्रणाली  अहवालातून ही माहिती समोर आली  आहे. शहरी भागातील मुली ग्रामीण भागातील मुलींच्या तुलनेत उशिरा विवाह करतात. बहुतेक राज्यांमध्ये असेच दिसते. राष्ट्रीय स्तरावर मुलींचे विवाहाचे सरासरी वय २२.९ वर्षे आहे.  

राज्यटक्केवारी
प. बंगाल  ५१.२
झारखंड ४६.१
बिहार  ३८.३
आसाम ३६.०
ओडिशा२९.८
छत्तीसगड२९.२
मध्य प्रदेश२८.०
राजस्थान२४.१
महाराष्ट्र  २२.१
उत्तर प्रदेश१९.०

पश्चिम बंगाल (६.३%) आणि झारखंडमध्ये (४.६%) मुलींचे विवाह अजूनही कमी वयात होतात तर जम्मू-काश्मीर आणि हरयाणामध्ये विवाह उशिरा होतात. २१ वर्षे व त्याहून अधिक वयात विवाह करण्याचे प्रमाण सर्वाधिक जम्मू-काश्मीरमध्ये (९०.३%) तर हरयाणामध्ये ८६.१% इतके आहे. 

महाराष्ट्रात तरुणींचे १८ वर्षांपूर्वी  विवाह लावून देण्याचे प्रमाण १ टक्के आहे. १८-२० वर्षे वयोगटात २०.७% विवाह होत असून, २१ वर्षे व त्याहून अधिक वयात ७८.३% विवाह होत आहेत.

विभाग     १८ वर्षांपूर्वी (%)१८-२० वर्षे (%)२१ वर्षे व त्याहून अधिक (%)
भारत (एकूण)२.१ २५.०७२.९
ग्रामीण भाग२.५२८.१६९.४
शहरी भाग  १.२ १७.०८१.८

Web Title: 22% of girls in Maharashtra have baldness before the age of 20

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.