शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

२२ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची हत्या

By admin | Updated: September 8, 2015 00:55 IST

दरवर्षी आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची त्यांच्याच जुन्या सहकाऱ्यांकडून हत्या होत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे या नक्षलवाद्यांच्या जीवनसुरक्षेचा प्रश्न सोडविण्यात

गडचिरोली : दरवर्षी आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची त्यांच्याच जुन्या सहकाऱ्यांकडून हत्या होत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे या नक्षलवाद्यांच्या जीवनसुरक्षेचा प्रश्न सोडविण्यात अद्यापही राज्य शासनाला यश आल्याचे दिसत नाही. १९८५ ते २०१५ या ३० वर्षांच्या कालावधीत २२ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांकडून हत्या झाली आहे.जिल्ह्यात १९८०च्या दशकात नक्षल चळवळीला सिरोंचा तालुक्यातून प्रारंभ झाला. परंतु २००५नंतर नक्षल आत्मसमर्पण योजनेला शासनस्तरावरून वेग देण्यात आला. आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांची संख्याही बऱ्यापैकी वाढू लागली. आतापर्यंत ४७९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून, १ हजार २६५ नक्षलवादी व त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी अटक केली आहे.मागील सहा वर्षांत नऊ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची त्यांच्याच जुन्या सहकाऱ्यांनी हत्या केली. २०१०मध्ये ३ आत्मसमर्पितांची हत्या करण्यात आली. २०११मध्ये २, २०१४मध्ये १ व २०१५मध्ये २ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची त्यांच्याच जुन्या सहकाऱ्यांनी हत्या केली आहे. जे नक्षलवादी आत्मसमर्पण योजनेचा लाभ घेतल्यानंतर आपल्या जुन्या गावाकडे राहण्यासाठी जातात, ते लोक नक्षलवाद्यांचे लक्ष्य बनतात. त्यामुळे आत्मसमर्पण केलेले बरेच नक्षलवादी आपल्या परिवारासह जिल्हा व तालुका मुख्यालयात राहू लागले आहेत. तरीही त्यांच्या जीविताचा धोका सातत्याने वाढत आहेत. (प्रतिनिधी)