शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक! नितीश कुमार यांनी 10 व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; पाहा मंत्र्यांची संपूर्ण यादी
2
सांगलीकर काळजी घ्या! ऊसाच्या शेतामध्ये बिबट्याची चार पिल्लं सापडली, एकच खळबळ
3
ऐन निवडणुकीत शिंदेसेनेच्या २ उमेदवारांनी अर्ज घेतला मागे; उपजिल्हाप्रमुखांसह भाजपात केला प्रवेश
4
"ठाकरेंवर आरोप करणारी भाजपा २० वर्ष BMC मध्ये उपमहापौरपदी होती हे सोयीस्करपणे विसरते"
5
Sonam Kapoor : सोनम कपूर दुसऱ्यांदा होणार आई, बेबी बंप फ्लॉन्ट करत केलं फोटोशूट; नवऱ्याची मजेशीर कमेंट
6
कूनोतून आली गुडन्यूज; भारतात जन्मलेल्या पहिल्या मादी चित्ता ‘मुखी’ने दिला 5 शावकांना जन्म
7
नक्षलवाद्यांसोबतच्या चकमकीत हाॅकफोर्सचे पोलीस उपनिरिक्षक आशिष शर्मा यांना वीरमरण, जानेवारीत होणार होतं लग्न
8
आरोग्य विमा होणार स्वस्त? प्रीमियमच्या मनमानी वाढीला लगाम लागणार; सरकार उचलणार 'ही' मोठी पाऊले!
9
महिन्यात दिवस कमी असो किंवा जास्त, पगार नेहमी ३० दिवसांचाच का येतो? काय आहे कॅलक्युलेट करण्याचा फॉर्म्युला
10
VIDEO: जिममध्ये वजन उचलताना अचानक तोल गेला, मुलीच्या मानेवर पडला वजनदार बार अन् मग...
11
'आजोबा वारले, तरी इंडक्शन कॉलला हजर रहा!' कॉर्पोरेट जगात 'विषारी' वर्ककल्चरचा कळस; नेटकऱ्यांचा संताप
12
टेन्शन वाढलं! देशात व्हायरल इन्फेक्शनचा वेगाने प्रसार; ICMR चा धडकी भरवणारा रिपोर्ट
13
Russia Ukraine War: युक्रेनचा रशियावर पुन्हा 'घाव'; भयंकर हवाई हल्ल्यात लहान मुलांसह २५ नागरिकांचा मृत्यू
14
शाहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचे नेत्यांना आदेश; जिल्हाप्रमुखांपासून सगळ्यांना पोहचला संदेश
15
‘कुठे गेले दंड फुगवून आव्हाने देणाऱ्या ठाकरेंचे आणि मविआचे उमेदवार?’, भाजपाने डिवचले  
16
देशात आता केवळ ४ सरकारी बँक राहणार? विलीनीकरणासाठी केंद्राकडे प्रस्ताव; 'या' ६ बँका एक होणार?
17
Numerology: तुमचा जन्म ‘या’ ३ पैकी तारखांना झालाय? गूढ-रहस्य असते जीवन, केतु देतो अमाप पैसा!
18
वैभव सूर्यवंशीचा सुपरहिट धमाका! गोलंदाजांची धुलाई करत बनला 'नंबर १'; भारतही सेमीफायनलमध्ये
19
4-5 उचक्या अन् जीव सोडला; मुंबईहून उत्तर प्रदेशला जाणाऱ्या प्रवाशाचा ट्रेनमध्ये दुर्दैवी मृत्यू
20
सैराटची पुनरावृत्ती! प्रेमविवाहामुळे नाराज झालेल्या कुटुंबाने मुलीवर गोळ्या झाडून केली हत्या
Daily Top 2Weekly Top 5

ऐन निवडणुकीत शिंदेसेनेच्या २ उमेदवारांनी अर्ज घेतला मागे; उपजिल्हाप्रमुखांसह भाजपात केला प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 11:10 IST

शिंदेसेनेचे उपजिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांच्यासह या २ महिला उमेदवारांनी अर्ज माघारी घेत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे

जळगाव - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतील शिंदेसेना-भाजपातच रस्सीखेच सुरू असल्याचं दिसून येते. जामनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत ऐनवेळी भाजपाचे संकटमोचक असणारे गिरीश महाजन यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला धक्का दिला आहे. महाजनांच्या या खेळीमुळे जामनेरमध्ये भाजपाचे २ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. शिंदेसेनेच्या २ उमेदवारांनी भाजपासमोर आव्हान उभे केले होते. परंतु याच उमेदवारांना अर्ज मागे घेत भाजपात प्रवेश करण्यासाठी गिरीश महाजनांनी केलेले प्रयत्न यशस्वी ठरले आहेत.

जामनेर नगरपालिकेत भाजपा आणि शिंदेसेनेचे उमेदवार आमनेसामने आले होते. एकनाथ शिंदे यांच्याकडून वार्ड क्रमांक १ मध्ये मयुरी चव्हाण आणि वार्ड नंबर १३ मधून रेशंता सोनवणे यांनी एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज भरला होता. याठिकाणी वार्ड क्रमांक १ मध्ये सपना झाल्टे आणि वार्ड १३ मधून किलुबाई शेवाळे यांनी भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे या वार्डात भाजपा-शिंदेसेना समोरासमोर आले होते. मात्र मतदानापूर्वीच गिरीश महाजनांनी मोठी खेळी करत शिंदेसेनेच्या २ उमेदवारांना अर्ज मागे घेत त्यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्यास यश मिळवले आहे. 

विशेष म्हणजे शिंदेसेनेचे उपजिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांच्यासह या २ महिला उमेदवारांनी अर्ज माघारी घेत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. माजी नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. मयुरी चव्हाण आणि रेशंता सोनवणे यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने भाजपाच्या सपना झाल्टे, किलुबाई शेवाळे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे जामनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत आणखी २ भाजपा नगरसेवक बिनविरोध झाले आहेत. 

एकनाथ शिंदेंची नाराजी

दरम्यान, काही दिवसांपूर्वी डोंबिवली येथे रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेचे काही माजी नगरसेवक भाजपात सामील झाले. या पक्षप्रवेशानंतर एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. या नाराजीचे पडसाद राज्याच्या कॅबिनेट बैठकीत उमटले. शिंदे वगळता इतर मंत्र्‍यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. त्यानंतर नाराज मंत्र्‍यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रताप सरनाईक यांनी माहिती दिली होती. यापुढे महायुतीत एकमेकांचे नेते फोडले जाणार नाहीत. परंतु जळगाव जामनेर येथे गिरीश महाजनांनी उपजिल्हाप्रमुखांसह शिंदेसेनेच्या २ महिला उमेदवारांनाच निवडणुकीतून माघार घ्यायला लावत भाजपात प्रवेश दिला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Shinde Sena Candidates Withdraw, Join BJP Amidst Jalgaon Election

Web Summary : In Jalgaon, Shinde Sena candidates withdrew from the Jamner municipal elections and joined BJP due to Girish Mahajan's efforts. This led to two BJP candidates winning unopposed, causing tension within the ruling coalition and echoing previous disagreements.
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाGirish Mahajanगिरीश महाजनMahayutiमहायुतीShiv Senaशिवसेना