पहिली ते चौथीचे वर्ग लवकरच सुरू होणार? टास्क फोर्सने दिली संमती, आज निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 06:25 AM2021-11-25T06:25:36+5:302021-11-25T06:26:33+5:30

मुले आजारी पडण्याचे प्रमाण जास्त नाही. रोज ७०० ते ८०० नवीन रुग्ण सापडत आहेत. त्यात मुलांची संख्या नाममात्र असल्याने पालकांनी चिंता करण्याचे कारण नाही, असे सांगून टोपे म्हणाले की, पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेत येऊ द्यायला हवे, अशी सूचना टास्क फोर्सने केली आहे.

1st to 4th class starting soon Task Force gives consent, decision today | पहिली ते चौथीचे वर्ग लवकरच सुरू होणार? टास्क फोर्सने दिली संमती, आज निर्णय

पहिली ते चौथीचे वर्ग लवकरच सुरू होणार? टास्क फोर्सने दिली संमती, आज निर्णय

Next

मुंबई : मुलांच्या आरोग्यासाठी स्थापन केलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टास्क फोर्सने पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्याला हिरवा कंदील दिला आहे. आरोग्य विभागानेही त्यास मान्यता दिली. आता शाळा कधी सुरू करायच्या याचा अंतिम निर्णय उद्या, गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

मुले आजारी पडण्याचे प्रमाण जास्त नाही. रोज ७०० ते ८०० नवीन रुग्ण सापडत आहेत. त्यात मुलांची संख्या नाममात्र असल्याने पालकांनी चिंता करण्याचे कारण नाही, असे सांगून टोपे म्हणाले की, पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेत येऊ द्यायला हवे, अशी सूचना टास्क फोर्सने केली आहे. आरोग्याबरोबरच मुलांच्या मनोवस्थेचाही विचार व्हायला हवा, अशी सूचना टास्क फोर्सने केली आहे. आरोग्याचे सर्व नियम पाळून पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करायला परवानगी देण्याची टास्क फोर्सची भूमिका मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कळवली आहे. १२ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण केले पाहिजे, यावर टास्क फोर्स आग्रही आहे. ही बाब केंद्र सरकारलाही कळविण्यात आली आहे. केंद्र सरकारने मान्यता दिल्यानंतर या वयोगटाच्या मुलांचेही लसीकरण सुरू केले जाईल.

टोपे म्हणाले...
- तिसरी लाट अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी या तीन देशांमध्ये घातक ठरलेली आहे. 
- आपल्याकडे रेस्टॉरंट, धार्मिक ठिकाणे आणि राजकीय सभांमध्ये गर्दी वाढत आहे. परंतु आपण बेफिकिरी करून चालणार नाही.
- मुख्यमंत्री ठाकरे यांची तब्येत चांगली आहे. फिजिओथेरपी 
सुरू असून, गुरुवारी ते राज्य 
मंत्रिमंडळाच्या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित असतील.
 

Web Title: 1st to 4th class starting soon Task Force gives consent, decision today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.