उजनी धरणावर फेब्रुवारीत आले १८ हजार पक्षी, मार्चमध्ये सात हजार पक्ष्यांचा वावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 06:19 IST2025-04-02T06:19:43+5:302025-04-02T06:19:58+5:30

Solapur News: वन विभाग आणि वाईल्ड रिसर्च अँड कॉन्झर्वेशन सोसायटीतर्फे नोव्हेंबर २०२४ ते मार्च २०२५ दरम्यान उजनी धरण व परिसरात पक्ष्यांची गणना करण्यात आली. या गणनेत फेब्रुवारीत सर्वाधिक म्हणजे १८ हजार ७५६ पक्षी आढळले. या गणनेत काही दुर्मीळ प्रजातींसह बॅलिअन्स क्रेक आणि जॅक स्नाइप यांसारखे पक्षीही आढळले.

18,000 birds arrived at Ujani Dam in February | उजनी धरणावर फेब्रुवारीत आले १८ हजार पक्षी, मार्चमध्ये सात हजार पक्ष्यांचा वावर

उजनी धरणावर फेब्रुवारीत आले १८ हजार पक्षी, मार्चमध्ये सात हजार पक्ष्यांचा वावर

सोलापूर -  वन विभाग आणि वाईल्ड रिसर्च अँड कॉन्झर्वेशन सोसायटीतर्फे नोव्हेंबर २०२४ ते मार्च २०२५ दरम्यान उजनी धरण व परिसरात पक्ष्यांची गणना करण्यात आली. या गणनेत फेब्रुवारीत सर्वाधिक म्हणजे १८ हजार ७५६ पक्षी आढळले. या गणनेत काही दुर्मीळ प्रजातींसह बॅलिअन्स क्रेक आणि जॅक स्नाइप यांसारखे पक्षीही आढळले.
आययूसीएन (इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर) रेडलिस्टेड असलेल्या काही पक्ष्यांचीही नोंद झाली आहे. असुरक्षित श्रेणीत रिव्हर टर्न, कॉमन पोचार्ड आणि ग्रेटर स्पॉटेड ईगल यांचा समावेश आहे. 

स्थलांतरित पाणपक्ष्यांची संख्या कमी 
संकटग्रस्त प्रजातींमध्ये एशियन वुली-नेक्ड स्टॉर्क, ओरिएंटल डार्टर, ब्लॅक-हेडेड आयबिस, ब्लॅक-टेल्ड गॉडविट आणि पॅलिड हरियर यांचा समावेश आहे. डिसेंबर २०२४ मध्ये पाण्याची पातळी जास्त असल्यामुळे स्थलांतरित पाणपक्ष्यांची संख्या कमी होती. 

पाण्याची पातळी कमी झाल्याने संख्या वाढली
जानेवारी आणि फेब्रुवारीत पाण्याची पातळी कमी झाल्याने पक्ष्यांची संख्या वाढली. आता मार्चमध्ये बार-हेडेड गूज, गडवॉल, युरेशियन विजन यांसारख्या स्थलांतरित पक्ष्यांनी परतीच्या प्रवासास सुरुवात केल्यामुळे संख्येत घट झाली आहे.

पक्षी गणनेतील तथ्य
महिना     वर्ष     आढळलेले पक्षी
नोव्हेंबर     २०२४     ७,७१७ 
डिसेंबर     २०२४     ५,९२१ 
जानेवारी     २०२५     ११,९६६ 
फेब्रुवारी     २०२५     १८,७५६ 
मार्च     २०२५     ७,११५

Web Title: 18,000 birds arrived at Ujani Dam in February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.