बॅटरी चोरीला कंटाळून तरुणाने फोडली १७ वाहने
By Admin | Updated: August 26, 2016 06:54 IST2016-08-26T06:54:31+5:302016-08-26T06:54:31+5:30
वाहनांतून वारंवार होत असलेल्या बॅटरी चोरीच्या घटनांना कंटाळून एका तरुणाने तब्बल १७ गाड्या फोडल्या.

बॅटरी चोरीला कंटाळून तरुणाने फोडली १७ वाहने
मुंबई : वाहनांतून वारंवार होत असलेल्या बॅटरी चोरीच्या घटनांना कंटाळून एका तरुणाने तब्बल १७ गाड्या फोडल्या. या घटनेने डंकन रोड परिसरात खळबळ उडाली. जे.जे. मार्ग पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपी इमरान गुलाम काझी (३५)सह पाच जणांना अटक केली आहे. याच परिसरात उभ्या असलेल्या गाड्यांमुळे पार्किंगलाही जागा
मिळत नाही. याच रागातून त्याने या परिसरात उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फोडण्यास सुरुवात केली. त्याच्यासह अन्य पाच सहकारीही दिसेल ती वाहने फोडत
गेले. यादरम्यान १७ वाहने फोडण्यात आली. यामध्ये १५ टेम्पो आणि दोन कारचा समावेश आहे. तर अन्य वाहनांचेही किरकोळ नुकसान झाले आहे.
जे.जे. मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप शिंदे
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक करंडे आणि तपास पथकाने रातोरात या आरोपींच्या मुसक्या आवळल्या. यामध्ये इमरान काझीसह मोहम्मद अली मन्सुरी (३८) आणि अन्य तिघा मित्रांना अटक करण्यात आली आहे. इमरान हा अभिलेखावरील आरोपी आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती जे.जे. मार्ग पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)
>रागाच्या भरात कृत्य
डंकन रोड परिसरात इमराम गुलाम काझी (३५)राहण्यास आहे. बुधवारी रात्री मित्राच्या वाढदिवसानिमित्त दारू पार्टी करून तो घराकडे परतला. त्याच दरम्यान त्याच्या गाडीमधील बॅटरीची चोरी झाल्याचे त्याच्या लक्षात आले. ‘आपल्याच गाडीतील सामानाची चोरी करून तेच सामान चोर बाजारात विकत घ्यावे लागत असल्याने हा तरुण कंटाळला होता. याच रागात त्याने चोर बाजारात सामान विक्री करणाऱ्या महिलेला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.