शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

राज्यात आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत १७ टक्के अधिक मान्सून वर्षा; मराठवाड्यात सर्वाधिक ३२ टक्के  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2020 11:25 IST

गेल्या दोन वर्षांपासून पावसाने संपूर्ण देशासह राज्यावर कृपादृष्टी ठेवली आहे.

ठळक मुद्देअकोला, यवतमाळमध्ये मोठी तुट

पुणे : यंदा मॉन्सूनने भरभरुन साथ दिली असून पावसाळ्याचे चार महिने संपत असताना राज्यात आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत १७ टक्के अधिक पावसाची नोंद झाली असतानाच विदर्भात मात्र -९ टक्के पाऊस कमी असून यवतमाळ -२३ टक्के आणि अकोला जिल्ह्यात - २६ टक्के कमी पाऊस झाला आहे.  गेल्या दोन वर्षांपासून पावसाने संपूर्ण देशासह राज्यावर कृपादृष्टी ठेवली आहे. दरवर्षी दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मराठवाड्यात यंदा सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक ३२ टक्के पाऊस पडला आहे. पावसाळ्याचे ४ महिने संपत आले असताना २७ सप्टेंबरपर्यंत विदर्भातील ११ जिल्ह्यांपैकी केवळ वाशिम, नागपूर आणि बुलढाणा या ३ जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला आहे. अन्य ८ जिल्ह्यात अजूनही कमी पाऊसमान आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या तीनही विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये यंदा सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला आहे. मॉन्सून साधारण १५ जूनपर्यंत संपूर्ण राज्य व्यापतो़ यंदा राज्यात मॉन्सूनचे उशिरा आगमन झाले तरी त्याने संपूर्ण राज्य व्यापण्याची आपली परंपरा यंदा पाळली. मात्र, विदर्भातील सर्वच जिल्ह्यात सुरुवातीपासूनच यंदा पाऊसमान कमी होते. त्यात बंगालच्या उपसागरात यंदा कमी दाबाचे क्षेत्र कमी तयार झाली व त्यांचा मुख्य अक्ष हा हिमालयाच्या पायथ्याशी असल्याने बंगालच्या उपसागराकडून मिळणारा पाऊस यंदा विदर्भात फारसा बरसलाच नाही. जूनच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळानंतरही अरबी समुद्रात सातत्याने द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात नियमितपणे पाऊस होत गेला.  .....................

राज्यात सर्वाधिक पाऊस झालेले जिल्हे : अहमदनगर (८४टक्के), मुंबई शहर (६०), मुंबई उपनगर (६९), औरंगाबाद (६८ टक्के)सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेले जिल्हे रत्नागिरी (२५ टक्के), सिंधुदुर्ग (५४टक्के), धुळे (५०), जळगाव (२५), कोल्हापूर (२४), नाशिक (२१), पुणे (४२), सांगली (३१), सोलापूर (३०), बीड (४९), जालना (४१), लातूर (३१), उस्मानाबाद (२६), परभणी (२० टक्के) सरासरीपेक्षा अधिक सर्वसाधारण पाऊस झालेले जिल्हे पालघर (१४ टक्के), रायगड (१६), नंदूरबार (११), सातारा (८), हिंगोली (८), नांदेड (१०), बुलढाणा (६), वाशिम (१७ टक्के), नागपूर (७ टक्के)़ 

सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेले जिल्हे : अकोलो (-२६ टक्के), अमरावती (-१९), भंडारा (-४), चंद्रपूर (-१८), गडचिरोली (-८),  गोंदिया (-८), वर्धा (-७), यवतमाळ (-२३टक्के)़़़़़़़़़़़़़़़़कोकण विभागात २९ टक्के अधिकमध्य महाराष्ट्रात ३१ टक्के अधिकमराठवाडा ३२ टक्के अधिकविदर्भात -९ टक्के कमी पाऊसमानसंपूर्ण राज्यात १७ टक्के अधिक पाऊस

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसMonsoon Specialमानसून स्पेशलweatherहवामान