मुंबई : मध्य रेल्वेने हार्बर मार्गावरील बारा डब्यांच्या सेवेत वाढ केली आहे. या मार्गावर बारा डब्यांच्या सतरा लोकल शुक्रवारपासून धावण्यास सुरुवात झाली आहे. यात सीएसटी-पनवेलसह सीएसटी-अंधेरी मार्गाचा समावेश आहे.२९ एप्रिल रोजी हार्बर मार्गावर पहिल्यांदा बारा डब्यांची लोकल चालवण्यात आली होती. त्यानंतर, या कामाला वेग आला. शिवाय, या अंतर्गत फलाटांच्या विस्ताराचे कामही हाती घेण्यात आले. आता या मार्गावर बारा डब्यांच्या सतरा गाड्या चालवण्यात येत आहेत. सीएसटी ते अंधेरीपर्यंत पहिली बारा डब्यांची लोकल २० जून रोजी चालवण्यात आली होती. बारा डब्यांच्या लोकलपैकी चार गाड्या अंधेरी ते सीएसटी मार्गावर चालवण्यात येत आहेत. हार्बरवर दररोज २६१ फेऱ्यांची सुविधा येथे देण्यात येत आहे. त्यामुळे प्रवासी संख्येत वाढ झाली असून, प्रत्येक लोकलमधील प्रवासी वाहून नेण्याची क्षमता ३३ टक्क्यांनी वाढल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. (प्रतिनिधी)
हार्बरवर १२ डब्यांच्या १७ लोकल; प्रवाशांना दिलासा
By admin | Updated: June 26, 2016 04:13 IST