एसटीच्या ताफ्यात १,५६९ नव्या गाड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 06:54 IST2025-06-09T06:53:42+5:302025-06-09T06:54:09+5:30

New ST Bus: राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाला मे महिनाअखेरपर्यंत  २,६४० पैकी १,५६९ स्वमालकीच्या लालपरी बस मिळाल्या आहेत. तसेच उर्वरित बस सप्टेंबरपर्यंत ताफ्यात येण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. 

1,569 new vehicles in ST fleet | एसटीच्या ताफ्यात १,५६९ नव्या गाड्या

एसटीच्या ताफ्यात १,५६९ नव्या गाड्या

मुंबई - राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाला मे महिनाअखेरपर्यंत  २,६४० पैकी १,५६९ स्वमालकीच्या लालपरी बस मिळाल्या आहेत. तसेच उर्वरित बस सप्टेंबरपर्यंत ताफ्यात येण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

एसटी महामंडळाच्या ताफ्यातील सर्व जुन्या बस या स्क्रॅप करण्यात येत आहेत. तेथे नवीन बसेस उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या वर्षी अशोक लेलँड कंपनीच्या २,६४० बस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यापैकी १,५०३ बस राज्यभरातील विविध आगारांमध्ये सेवेत आहेत. तर दापोडी आगारात ६६ बस उभ्या असून, त्यातील २५ बसेसची नोंदणी झाली आहे. त्या वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत. तर ४१ बसची नोंदणी अद्याप झालेली नाही. अशा एकूण १,५६९ बस  एसटीला मिळाल्या आहेत.

कोणत्या शहराला किती बस ? 
मुंबई      : ३५
पुणे     : ६०
ठाणे     : ५५
रत्नागिरी     : ५०
पालघर     : ३५
रायगड    : ३०

Web Title: 1,569 new vehicles in ST fleet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.