शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

डिसेंबर अखेर ‘स्लीपर शिवशाही’ धावणार, १५० शिवशाही एसटी ताफ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 19:59 IST

एसटी महामंडळाच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. शयनयान(स्लीपर)  शिवशाही सज्ज...

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची शयनयान (स्लीपर) शिवशाही आता प्रवासी सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज होत आहे. डिसेंबरअखेर वातानुकूलित शिवशाही आंतरराज्य मार्गावर धावणार आहेत. ही शिवशाही ३० आसनी असणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई आणि पुणे येथून आंतरराज्य मार्गावर ही स्लीपर शिवशाही धावणार आहे. भाडेतत्त्वावर असलेल्या १५० शिवशाही मार्च अखेर रस्त्यावर उतरतील. ‘स्लीपर शिवशाही’मुळे एसटी महामंडळाच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला जाणार आहे. 

एसटी महामंडळाची वातानुकूलित आणि अत्याधुनिक ‘ड्रीम एसटी’ म्हणून शिवशाही ओळखली जाते. २ बाय १ अशी आसन व्यवस्था असलेल्या या बसमध्ये एकूण ३० प्रवासी एकाचवेळी प्रवास करु शकणार आहेत. पूर्ण वातानुकूलित या एसटीला मोबाईल चार्जिंगसह मोबाईल रॅकची सोय देण्यात आली आहे. बैठक आसनी शिवशाहीप्रमाणे सर्व सुविधा या बसमध्ये देखील असणार आहेत. प्रवाशांच्या मागणीनुरुप चादर आणि उशी महामंडळातर्फे प्रवाशांना पुरवण्यात येणार आहे.

बैठक आसनी शिवशाहीबाबत तक्रारीनंतर शिवशाहीत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार चालकाला आराम करण्यासाठी विशेष सोय स्लीपर शिवशाहीत देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यांतर्गत ४६० शिवशाही एसटी ताफ्यात दाखल होणार आहे.  सध्या १०७ शिवशाही महामंडळाच्या ताफ्यात धावत आहेत. यात महामंडळाच्या स्वमालकीच्या ७० आणि भाडेतत्त्वावर ३७ बसेसचा समावेश आहे.

मुंबई आणि पुणे येथून आंतरराज्य मार्गावर स्लीपर शिवशाही धावणार आहे. मुंबई-हैद्रराबाद, मुंबई-पणजी आणि मुंबई- नागपूर अशा संभाव्य मार्गावरुन स्लीपर एसटी धावणार आहे. पुणे येथून पुणे-सुरत, पुणे- पणजी आणि पुणे-इंदौर या संभाव्य मार्गावर ही सेवा सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

लांब पल्ल्यासाठी ‘स्लीपर’-

मार्च अखेर २००० शिवशाही महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यात स्लीपर शिवशाहीचा देखील समावेश आहे. तीन टप्प्यात स्लीपर शिवशाही दाखल होणार आहे. याबसच्या विविध चाचण्या होणार आहेत. चाचण्या पूर्ण झाल्यानंतर प्रवासी सेवेत त्या दाखल होतील. पहिल्या टप्प्यातंर्गत डिसेंबरअखेर स्लीपर शिवशाही महामंडळातील प्रवाशांसाठी उपलब्ध होतील. लांब पल्ल्यांच्या अंतरावर या ‘स्लीपर शिवशाही’ चालवण्यात येणार आहे.

-रणजित सिंह देओल, एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

 

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ