शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

बिबरच्या कार्यक्रमाच्या सुरक्षेचे १५ लाख बिल

By admin | Updated: May 26, 2017 00:31 IST

पॉप सिंगर जस्टीन बिबरच्या नवी मुंबईत झालेल्या कार्यक्रमासाठी पुरवलेल्या सुरक्षेचे पोलिसांनी १५ लाख रुपये बिल आकारले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पॉप सिंगर जस्टीन बिबरच्या नवी मुंबईत झालेल्या कार्यक्रमासाठी पुरवलेल्या सुरक्षेचे पोलिसांनी १५ लाख रुपये बिल आकारले आहे. काही कार्यक्रमांच्या बंदोबस्ताची रक्कम मिळवण्यासाठी पोलिसांचा चांगलाच घाम निघालेला आहे. असाच अनुभव बिबरच्या बंदोबस्ताबाबत होऊ नये याकरिता कार्यक्रमापूर्वीच पोलिसांनी बिलाची रक्कम जमा करून घेतली आहे.जगप्रसिद्ध पॉप सिंगर जस्टीन बिबर याचा भारतातला पहिलाच कार्यक्रम नेरुळच्या डी. वाय. पाटील स्टेडिअमवर १० मे रोजी झाला होता. बिबरचा लाइव्ह शो पाहण्यासाठी ५ हजार ते ७० हजार रुपयांपर्यंतचे तिकीट खरेदी करून देशभरातील सुमारे ३५ ते ४० हजार चाहते उपस्थित राहिले होते. तर या कार्यक्रमादरम्यान स्टेडिअममध्ये अथवा बाहेरच्या आवारात कोणताही गैरप्रकार घडू नये याकरिता नवी मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता. कार्यक्रमस्थळी ५०० हून अधिक पोलीस कर्मचारी तर ७५ अधिकारी बंदोबस्तावर नेमण्यात आले होते. कार्यक्रमाच्या दिवशी दुपारी १ वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत पोलिसांचा हा बंदोबस्त होता. त्याशिवाय स्टेडिअमच्या प्रत्येक मार्गावर २०० हून अधिक वाहतूक पोलीस कार्यरत करण्यात आले होते. कोणतीही पूर्वकल्पना न देता बिबर स्टेडिअममध्ये कार्यक्रम सुरूअसताना वाशीतील मॉलमध्ये सहकाऱ्यांसह गेला होता. या वेळी त्याच्या सुरक्षेकरिता पोलिसांची चांगलीच धावपळ झालेली. त्यानुसार या कार्यक्रमादरम्यान पुरवलेल्या सुरक्षेचे १५ लाख रुपये बिल नवी मुंबई पोलिसांनी आयोजकाकडून आकारले आहे. ही रक्कम कार्यक्रमापूर्वीच अनामत रकमेच्या स्वरूपात जमा करून घेतलेली असल्याचे विशेष शाखा उपआयुक्त आर. बनसोडे यांनी सांगितले. यापूर्वी डी. वाय. पाटील स्टेडिअममध्येच झालेल्या आयपीएलच्या सामन्यासाठी पोलिसांनी सुरक्षा पुरवली होती. मात्र, या सुरक्षेचे सुमारे अडीच कोटी रुपयांचे बिल आयोजकांनी थकवले होते. असाच प्रकार बिबरच्या कार्यक्रमासाठी पुरवलेल्या सुरक्षेच्या बिल वसुलीत होऊ नये, याची खबरदारी यंदा नवी मुंबई पोलिसांनी घेतल्याचे यावरून दिसून येत आहे.