शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

शिवसेनेच्या 15 ते 20 आमदारांना हवं भाजपाबरोबर सरकार, उद्धव ठाकरेंकडून मनधरणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 11:55 AM

अजित पवार हे भाजपाबरोबर गेल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळंच वळण लागलं आहे.

मुंबई- अजित पवार हे भाजपाबरोबर गेल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळंच वळण लागलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसच्या गोटातही खळबळ उडाली. शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासाठी आणखी बराच काळ वाट पाहावी लागू शकते, अशीही अटकळ बांधली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या 15 ते 20 आमदारांना भाजपाबरोबर युती हवी आहे. शिवसेनेच्या रविवारी रात्री झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना काही आमदारांनी आपण भाजपाबरोबर जाऊ शकत नाही काय?, असा प्रश्न विचारल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे रात्री उशिरापर्यंत त्या आमदारांची समजूत काढत थांबले होते. तसेच आदित्य ठाकरेही हॉटेल ललितमध्ये असलेल्या आमदारांच्या संपर्कात आहेत. भाजपाबरोबर सरकार बनवण्यात अपयश आल्यानंतर शिवसेनेनं आपल्या आमदारांचा घोडेबाजार होऊ नये, यासाठी त्यांना एका हॉटेलमध्ये सुरक्षितरीत्या ठेवलं आहे. आमदारांच्या या प्रश्नानंतर उद्धव ठाकरेंना चिंतेनं ग्रासलं आहे. तसेच त्या आमदारांची मनधरणी करण्याचे प्रयत्नसुद्धा उद्धव ठाकरेंनी चालवले आहेत. आदित्य ठाकरे रात्री मातोश्रीवर परतणार होते, परंतु आमदारांनी व्यक्त केलेल्या प्रश्नानं आदित्य ठाकरे तिकडेच थांबले होते. ते आता हॉटेल ललितमध्येही उपस्थित आहेत. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरूचशिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपाच्या सरकारला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली असता ही याचिका खूप मर्यादित आहे, पण दोन्ही पक्ष याला विनाकारण वाढवत आहेत, असं मत न्यायमूर्तींनी व्यक्त केलं आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणात सुनावणी सुरूच राहणार आहे. 

भाजपाला 155 आमदारांचं समर्थन असल्याचा दावाशिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं राज्यपालांनी उचललेल्या पावलाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. न्यायालयानं रविवारी महाविकास आघाडीच्या याचिकेची दखल घेतली असून, आज पुन्हा त्यावर सुनावणी होणार आहे. याचदरम्यान भाजपानं दावा केला आहे की, त्यांच्याकडे 155 आमदारांचं समर्थन आहे. यात भाजपाचे 105, अजित पवार समर्थक 25 आमदार आणि 15 अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. तर महाविकास आघाडीनं आमच्याकडे 161 आमदारांचं संख्याबळ असून, शिवसेना 56, काँग्रेस 44 आणि राष्ट्रवादी 53 आणि 8 अपक्ष आमदारांचा समावेश आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी लवकर राज्यपालांना या आमदारांच्या समर्थनाचं पत्र सोपवणार आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा