शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

२१ राज्यांत १४४ कोटींचा शिष्यवृत्ती घोटाळा, महाराष्ट्रातील २१ संस्थांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 06:14 IST

याप्रकरणी सीबीआयने या ८३० संस्था, नोडल अधिकारी, काही बँकांचे अधिकारी यांच्याविरोधात दिल्लीत गुन्हा दाखल करत चौकशी सुरू केली आहे. 

मुंबई : अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेमध्ये १४४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची माहिती पुढे आली असून या प्रकरणी महाराष्ट्रातील २१ संस्थांसह २१ राज्यांतील ८३० संस्थांनी हा घोटाळा केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी सीबीआयने या ८३० संस्था, नोडल अधिकारी, काही बँकांचे अधिकारी यांच्याविरोधात दिल्लीत गुन्हा दाखल करत चौकशी सुरू केली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार, केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयातर्फे मुस्लीम, ख्रिश्चन, शिख, जैन, बौद्ध आणि पारशी अशा सहा धर्मांतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती योजना राबवली जाते. देशभरातील १ लाख ८० हजार संस्थांतील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळतो. या शिष्यवृत्ती योजनेत घोटाळा झाल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर संबंधित मंत्रालयाने नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकोनॉमिक रिसर्च या संस्थेला त्रयस्थपणे याची तपासणी करण्याचे निर्देश दिले.

तपासात १५७२ संस्थांच्या व्यवहार संशयास्पद वाटला. सखोल तपासणीअंती २१ राज्यांतील ८३० संस्था या बोगस किंवा बंद पडल्या असूनही त्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळवत असल्याचे निष्पन्न झाले. या ८३० संस्थांना २०१७ ते २०२२ या कालावधीत १४४ कोटी रुपयांचा निधी वितरित झाला होता. मात्र, या संस्थाच बोगस असल्यामुळे या निधीचा अपहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

कसा केला घोटाळा?

     या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी किंवा पर्यायी कागदपत्रे सादर करावी लागतात.     हे सादर केल्यानंतर दोन पातळ्यांवर याची पडताळणी होते. जिल्हा पातळीवरील नोडल अधिकारी आणि मग राज्य पातळीवरील नोडल अधिकारी याची पडताळणी करतात.     दोन्ही पातळ्यांवरील पडताळणीत हेराफेरी झाली. शैक्षणिक संस्था, बँका यांच्याशी संगनमत करून हे पैसे हडपण्यात आले.     काही संस्था केवळ कागदोपत्री अस्तित्वात आहेत. त्यांच्याद्वारे पात्र दाखविण्यात आलेले विद्यार्थीही बोगस असल्याचे दिसून आले.     काही संस्था पूर्णपणे बोगस आहेत. त्याद्वारेदेखील विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली.     आधार कार्डाद्वारे पडताळणी सक्तीची नसल्याचा फायदा घोटाळेबाजांनी घेतला.      काही आदिवासी शाळांमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थी नसूनही त्यांच्या नावे पैसे लाटले गेले आहेत.      काही शाळांत विद्यार्थ्यांना या योजनेची माहितीच देण्यात आली नाही. मात्र, त्यांच्या कागदपत्रांच्या आधारे शिष्यवृत्तीचे पैसे हडपले गेले.

     ४०८२ सदनिकांपैकी ३४६२ यशस्वी अर्जदारांचे स्वीकृती पत्र प्राप्त झाले.     ७७ विजेत्या अर्जदारांनी  उत्पन्नाबाबत आक्षेपार्ह माहिती सादर केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला आहे.     ३७० अर्जदारांनी त्यांना लागलेले घर परत करण्याबाबतचा निर्णय घेतला आहे.     यामध्ये प्रामुख्याने असे अर्जदार आहेत, ज्यांना सोडतीत एकापेक्षा अधिक घरे लागली आहेत.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रfraudधोकेबाजी