शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

जयंत पाटील यांच्यासह १४ जणांवर गुन्हा, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दोन आमदारांसह १० जणांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 2:51 AM

बेळगाव येथे प्रवेशबंदी आदेश झुगारून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यात सहभागी झाल्याने माजी मंत्री जयंत पाटील यांच्यासह १४ जणांवर टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बेळगाव : बेळगाव येथे प्रवेशबंदी आदेश झुगारून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यात सहभागी झाल्याने माजी मंत्री जयंत पाटील यांच्यासह १४ जणांवर टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दोन आमदारांसह १० जणांचा समावेश आहे.महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने सोमवारी बेळगावातील वॅक्सीन डेपो मैदानावर महामेळावा आयोजित केला होता. त्यासाठी महाराष्ट्रतील नेत्यांना प्रवेशबंदी होती. ती झुगारुन माजी मंत्री जयंत पाटील, कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक, चंदगडच्या आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी आमदार के. पी. पाटील हे चौघेजण गनिमीकाव्याने बेळगावात आले. या सर्वांनी महामेळाव्यात सहभाग घेऊन सीमावासियांना महाराष्ट्रचा पाठिंबा जाहीर केला.याप्रकरणी जयंत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी आमदार के. पी. पाटील, बेळगावचे आमदार संभाजी पाटील, खानापूरचे आमदार अरविंद पाटील, दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर, दिगंबर पाटील, प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, निंगोजी हुद्दार, नगरसेवक अनंत देशपांडे, बिदरचे रामभाऊ राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमच्यावर पोलिसांनी गुन्हे नोंद केले असले तरी अद्याप आम्हाला कोणतीही नोटीस मिळाली नसल्याची प्रतिक्रिया समिती नेत्यांनी दिली.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस