राज्यातील १४ मराठी पोलीस बनले आयपीएस; केंद्रीय गृह विभागाचे शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 07:42 AM2022-01-16T07:42:23+5:302022-01-16T07:42:45+5:30

केंद्रीय गृह विभागाकडून  त्यांच्या नामांकनावर शिकामोर्तब करण्यात आले आहे. सध्या हे अधिकारी राज्यात विविध ठिकाणी कार्यरत आहेत.

14 Marathi police in the state became IPS | राज्यातील १४ मराठी पोलीस बनले आयपीएस; केंद्रीय गृह विभागाचे शिक्कामोर्तब

राज्यातील १४ मराठी पोलीस बनले आयपीएस; केंद्रीय गृह विभागाचे शिक्कामोर्तब

Next

मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या १४ मराठी पोलीस अधिकाऱ्यांच्या  भारतीय पोलीस सेवेचा (आयपीएस) संवर्ग अखेर निश्चित झाला आहे. केंद्रीय गृह विभागाकडून  त्यांच्या नामांकनावर शिकामोर्तब करण्यात आले आहे. सध्या हे अधिकारी राज्यात विविध ठिकाणी कार्यरत आहेत.

शुक्रवारी त्याबाबतचे  सूचनापत्र (नोटिफिकेशन) जारी करण्यात आली आहे. केंद्रीय गृह विभागाकडून  राज्य पोलीस दलातील (मपोसे) अधिकाऱ्यांची  सेवाजेष्ठता व अन्य अटींची पूर्ततेच्या आधारावर दरवर्षी ‘आयपीएस’ श्रेणीमध्ये निवडले जाते. त्यासाठीची प्रक्रिया संथगतीने होत असल्याने त्याला विलंब होत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत असते. 

२०१९ व २०२० या वर्षाच्या निवडसूचीसाठी राज्य सरकारकडून अनुक्रमे ८ व ६ अधिकाऱ्यांच्या नावाचा अंतिम प्रस्ताव केंद्राकडे ४ महिन्यांपूर्वी पाठविला होता. यामध्ये सुमारे २० वर्षांपूर्वी राज्य पोलीस दलात उपाधीक्षक म्हणून रुजू झालेल्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर केंद्राने प्रलंबित प्रस्तावाला हिरवा कंदील दाखविला. या १४ जणांची आयपीएस सेवा ज्येष्ठता निश्चित केली जाईल.

आयपीएस बनलेल्या अधिकाऱ्यांची नावे :
२०१९ निवड सूची : एन ए अष्टेकर, मोहन दाहिलकर, विश्वास पानसरे, वसंत जाधव, स्मार्तन पाटील, एस डी. कोकाटे, प्रशांत मोहिते, संजय लाटकर
२०२० निवड सूची : सुनील भारद्वाज, सुनील काडसने, संजय बारकुंड, डी. एस. स्वामी, अमोल तांबे व संग्रामसिंह निशाणदार.

Web Title: 14 Marathi police in the state became IPS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.