Chandrapur: महिला, वृद्धांना मारहाण करणारे १३ जण अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 07:09 IST2021-08-24T07:09:01+5:302021-08-24T07:09:14+5:30

सोमवारी ‘लोकमत’ने या अमानवी प्रकाराचे वृत्त ठळकपणे प्रकाशित केल्यानंतर अवघ्या महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

13 arrested for beating women, elderly in Chandrapur | Chandrapur: महिला, वृद्धांना मारहाण करणारे १३ जण अटकेत

Chandrapur: महिला, वृद्धांना मारहाण करणारे १३ जण अटकेत

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिवती तालुक्यातील वणी खुर्द येथे दलित महिला-वृद्धांना भरचौकात खांबाला बांधून अमानुष मारहाण केल्याप्रकरणी १३ जणांना पोलिसांनी रविवारी मध्यरात्रीनंतर अटक केली. राजुरा न्यायालयाने त्यातील ४ जणांना पोलीस कोठडी तर नऊ आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली.

सोमवारी ‘लोकमत’ने या अमानवी प्रकाराचे वृत्त ठळकपणे प्रकाशित केल्यानंतर अवघ्या महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. रविवारी रात्री ‘लोकमत’ने चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे आणि गडचांदूर एसडीपीओ सुशीलकुमार नायक यांना घटनेबद्दल विचारणा केली होती. तोपर्यंत कुणालाही अटक झाली नव्हती. बातमीचा अंदाज येऊन रात्रीच पोलिसांनी सापळा रचून अटकसत्र आरंभले. एसपी साळवे व अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सोमवारी गावाला भेट दिली.

Web Title: 13 arrested for beating women, elderly in Chandrapur