१२ वैज्ञानिक अधिकाऱ्यांची सेवा कायम; मुंबई ‘मॅट’चे अंतरिम आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2018 01:12 AM2018-09-08T01:12:30+5:302018-09-08T01:12:44+5:30

न्यायवैद्यक प्रयोगशाळेत उत्कृष्ट काम करणा-या १२ वैज्ञानिक अधिका-यांच्या सेवा पुढील निर्णयापर्यंत कायम ठेवा, असा अंतरिम आदेश मुंबई ‘मॅट’चे चेअरमन अंबादास जोशी यांनी ३१ आॅगस्ट रोजी जारी केला.

 12 scientific officers maintain service; Interim order of Mumbai 'matte' | १२ वैज्ञानिक अधिकाऱ्यांची सेवा कायम; मुंबई ‘मॅट’चे अंतरिम आदेश

१२ वैज्ञानिक अधिकाऱ्यांची सेवा कायम; मुंबई ‘मॅट’चे अंतरिम आदेश

Next

यवतमाळ : न्यायवैद्यक प्रयोगशाळेत उत्कृष्ट काम करणा-या १२ वैज्ञानिक अधिका-यांच्या सेवा पुढील निर्णयापर्यंत कायम ठेवा, असा अंतरिम आदेश मुंबई ‘मॅट’चे चेअरमन अंबादास जोशी यांनी ३१ आॅगस्ट रोजी जारी केला.
समाधान काळे व इतर १२ वैज्ञानिक अधिकाºयांनी (सायबर/ टेप) मुंबई ‘मॅट’मध्ये अ‍ॅड. अरविंद बांदिवडेकर यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती. हे अधिकारी मुंबई, पुण्यात कार्यरत आहेत.

कायम नियुक्तीचा चेंडू सरकारकडे
या अधिकाºयांना कायम नियुक्ती देण्याच्या दृष्टीने सरकार काही धोरणात्मक निर्णय घेऊ शकते का, असा प्रश्न उपस्थित करून तो निर्णय सरकारवर सोडला आहे. सरकार सकात्मक विचार करेल, अर्जदारांचा पैसा व वेळ खर्ची घालण्यापेक्षा धोरणात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षा ‘मॅट’ने व्यक्त केली.

गाजलेल्या प्रकरणात पोलिसांना मदत
हे उच्चशिक्षित अधिकारी मागच्या दाराने आलेले नसून एमपीएससीच्या समकक्ष परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केली आहे. त्यांचे काम उत्कृष्ट आहे. मोपलवार, पुण्यातील स्फोट, शिना बोरा हत्याकांड यासारख्या गाजलेल्या प्रकरणांच्या तपासात त्यांचे पोलिसांना सहकार्य मिळते आहे. न्यायालयातील खटल्यांमध्येही त्यांची मदत महत्वपूर्ण ठरत आहे. त्यांच्या अहवालावरून ८० टक्के प्रकरणात आरोपींना शिक्षा झाल्याचे अ‍ॅड. बांदिवडेकर यांनी न्यायालयाला सांगितले.

Web Title:  12 scientific officers maintain service; Interim order of Mumbai 'matte'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.