शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

शस्त्रसाठाप्रकरणी जुंदालसह १२ दोषी

By admin | Updated: July 29, 2016 05:24 IST

दहा वर्षांपूर्वी औरंगाबाद (वेरूळ) येथे पकडलेल्या शस्त्रे व स्फोटकांच्या मोठ्या साठ्याप्रकरणी विशेष ‘मकोका’ न्यायालयाने गुरुवारी लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी अबू जुंदाल याच्यासह

मुंबई : दहा वर्षांपूर्वी औरंगाबाद (वेरूळ) येथे पकडलेल्या शस्त्रे व स्फोटकांच्या मोठ्या साठ्याप्रकरणी विशेष ‘मकोका’ न्यायालयाने गुरुवारी लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी अबू जुंदाल याच्यासह १२ आरोपींना दोषी ठरविले. शस्त्रे व स्फोटकांची ही जमवाजमव हा एक व्यापक कट होता तसेच २००२ मध्ये झालेल्या गोध्रा हत्याकांडाचा सूड उगवण्यासाठी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ नेते प्रवीण तोगडिया यांची हत्या करण्याचीही या आरोपींनी तयारी केली होती, असे निरीक्षणही न्यायालयान नोंदविले.विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. एल. अणेकर यांनी हा निकाल जाहीर करताना आठ आरोपींची निर्दोष मुक्तता केली. तसेच सर्व आरोपींवर ठेवलेले ‘मकोका’ कायद्याखालील आरोपही रद्द केले. दोषी ठरलेल्या जुंदालसह १२ आरोपींना शुक्रवारी २९ जुलै रोजी शिक्षा सुनावण्यात येईल. दोन आरोपींवर नंतर स्वतंत्रपणे खटला चालविण्यात येणार आहे. निर्दोष ठरलेल्या आठ जणांपैकी फिरोज देशमुख हा डॉ. झकीर नाईक याच्या इस्लामिक रीसर्च फाउंडेशनमध्ये काम करत होता. नाईकच्या प्रभावामुळे देशमुखने हे कृत्य केल्याचा पोलिसांचा दावा होता. मात्र न्यायालयाने तो फेटाळला. नाईकच्या प्रभावाखाली येऊन त्याने हे कृत्य केले, हे सरकारी वकील सिद्ध करू शकले नाहीत, असे न्यायालयाने म्हटले.विशेष न्यायालयाने आॅगस्ट २०१३ मध्ये २२ आरोपींवर आरोप निश्चित केले. खटल्यादरम्यान सरकारी वकिलांनी १०० साक्षीदारांची साक्ष नोंदवली. आरोपींकडून शस्त्र जप्त करण्यात आली, हे सिद्ध करण्यासाठी २००० कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आली. तर बचावपक्षाच्या वकिलांनी १६ साक्षीदारांची साक्ष नोंदवली.मोक्का कायद्यातील एका तरतूदीच्या घटनात्मक वैधतेला एका आरोपीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्याने खटल्याला स्थगिती देण्यात आली होती. २००९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ही स्थगिती हटवली. गेल्यावर्षी आॅगस्टमध्ये उच्च न्यायालयाने हा खटला जलदगतीने चालवण्याचा आदेश विशेष न्यायालयाला दिला होता.मुस्तफा सय्यद उर्फ मुन्ना मुस्तफा २००८ मध्ये माफीचा साक्षीदार झाला. मात्र चार वर्षानंतर म्हणजेच मे २०१२ मध्ये त्याने दंडाधिकाऱ्यांपुढे दिलेला कबुलीजबाब मागे घेतला म्हणून त्याच्यावरील खटला स्वतंत्रपणे चालवण्यात येणार आहे. अद्याप खटल्याला सुरुवात झाली नाही.तसेच शेख अब्दुल नईम उर्फ नय्यू उर्फ समीर याच्याविरुद्धचा खटलाही स्वतंत्रपणे चालवण्यात येणार आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, शेखला पश्चिम बंगालमधून हावडा-मुंबई सुपर फास्ट मेलने मुंबईला आणण्यात येत होते. छत्तीसगडमधील खर्सिया आणि शक्ती या दोन स्थानकांमध्ये रेल्वे धावत असताना पहाटे शेख पोलिसांच्या तावडीतून फरार झाला. मात्र शेखची आई कमार नसरिन शेख (६०) हिने उच्च न्यायालयात हॅबिस कॉर्पस (हरवलेली व्यक्ती उपस्थित करण्याची मागणी करणारी याचिका) दाखल केली आहे. तिने याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी उच्च न्यायालयात केली आहे. याचिकेनुसार, कमार यांना पोलिसांवर संशय आहे. पोलिसांनी शेखची चकमकीत हत्या केली असावी किंवा बेकायदेशीररीत्या कोठडीत ठेवले असावे.जुंदालला दोषी ठरवण्यात आल्यानंतर त्याला न्यायाधीश अणेकर यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. एक हात तोंडवर ठेवून न्यायाधीशांकडे हसत पाहणारा जुंदाल काही काळ स्तब्ध झाला होता. त्यानंतर त्याने न्यायाधीशांशी मराठीत बोलण्यास सुरूवात केली. कारागृहात आपल्याला जनावरांसारखे वागवण्यात येते, अशी तक्रार त्याने न्यायाधीशांकडे केली. ‘मला एकट्यालाच एका सेलमध्ये ठेवण्यात आल्याने मला मानसिक आणि शारीरिक त्रास होत आहे. या एकांतवासामुळे मला मानसिक उपचार घ्यावे लागत आहेत,’ असे जुंदालने न्यायाधीशांना सांगितले.‘मला अटक केल्याने लग्नाच्या तीन महिन्यानंतर माझ्या बहिणीला तिच्या पतीने घटस्फोट दिला. २००६ पर्यंत माझ्यावर एक फौजदारी गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र त्यानंतर अचानक अनेक केसेसमध्ये मला नाहक गुंतवण्यात आले. याचे कारण पोलिसांनाच माहित,’ असेही जुंदालने न्यायालयाला सांगितले. शिक्षेमध्ये दया दाखवण्यात यावी, अशी विनंती जुंदालने न्यायालयाला केली. ‘अंथरुणावर खिळलेल्या माझ्या वडिलांना बघायला कोणी नाही. घटस्फोटीत बहीण आणि आईचीही जबाबदारी माझ्यावर आहे,’ असे जुंदालने शिक्षेत सूट मागताना न्यायालयाला सांगितले (प्रतिनिधी)जुंदालवर इतरही अनेक खटले- अबू जुंदालवर नोंदवलेल्या काही केसेसपैकी पहिल्याच केसमध्ये तो दोषी असल्याचे सिद्ध झाले आहे. - मूळचा बीडचा असलेल्या अबू जुंदालवर २६/११च्या हल्ल्यामधील दहशतवाद्यांना हिंदी शिकवल्याचा आरोप आहे. - मुंबईवरील हल्ल्यात १६६ जण मृत्युमुखी पडले, तर दोन केसेस दिल्लीमध्ये नोंदविल्या आहेत आणि एक गुन्हा नाशिकमध्येही नोंदवला आहे. - यात आनाशिक पोलीस अ‍ॅकॅडमीवर हल्ला केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवला आहे.दोषी ठरलेले आरोपीमोहम्मद आमीर शेख, मोहम्मद मुझफ्फर, मुश्ताक अहमद शेख, जावेद अहमद, अफझल खान, डॉ. मोहम्मद शरीफ, बिलाल अहमद, सय्यद अकीफ, अफ्रोज खान पठाण, फैजल शेख, अस्मल काश्मिरी उर्फ सय्यद झबिउद्दीन सय्यद झाकिउद्दीन उर्फ जबी उर्फ रियासत अली उर्फ अबू जुंदालपुराव्याअभावी हे सुटले : मोहम्मद जुबेर सय्यद, अब्दुल अझीम उर्फ राजा, रियाझ अहमद उर्फ राजू, खातिब इम्रान अकिल अहमद, शेख विकार, अब्दुल समद खान, मोहम्मद अकिल मोमिन आणि फिरोज देशमुखडॉ. झकीर नाईक यांचा संबंध नाहीफिरोज देशमुख या आरोपीने दिलेल्या कबुलीजबाबात म्हटले आहे की, बांगलादेशचा एक फरारी आरोपी सतत त्याच्या संपर्कात होता. त्याला डॉ. झकीर नाईकच्या भाषणांची डिस्क हवी होती. मात्र विशेष न्यायालयाने देशमुखचा कबुलीजबाब फेटाळला. पोलिसांनी यासंदर्भात अपूर्ण तपास केला, असे म्हणत न्यायालयाने देशमुखची निर्दोष सुटका केली. यावर प्रतिक्रिया देताना फिरोज देशमुखने प्रसारमाध्यमांना सांगितले, त्याने झकीर नाईकच्या आयआरएफमध्ये कधीच काम केलेले नाही. मी झकीर नाईकविषयी ऐकले आहे, मात्र त्याच्याशी माझा कधीच संपर्क नव्हता.एटीएसने पकडल्या होत्या दोन गाड्यागोध्रा हत्याकांडाचा सूूड उगवण्यासाठी नरेंद्र मोदी व प्रवीण तोगडिया यांना लक्ष्य करण्याचा तसेच सामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा लष्कर-ए-तोयबाचा कट असल्याची टीप राज्य एटीएसला मिळाली. ९ मे २००६ रोजी एटीएस पथकाने टाटा सुमो व इंडिका कारचा पाठलाग करून मनमाड-चांदवड महामार्गावर दोन गाड्या पकडल्या. एटीएसने मोहम्मद आमीर शकील अहमद, मोहम्मद जुबेर सय्यद अन्वर आणि अब्दुल आजीम अब्दुल जमील शेख उर्फ राजा या तिघांना टाटा सुमोमधून ताब्यात घेतले. अबू जुंदाल त्या वेळी इंडिका कार चालवत होता.