रावसाहेब जाधव हत्येप्रकरणी 12 पोलीस अटकेत
By Admin | Updated: December 27, 2016 18:29 IST2016-12-27T18:29:07+5:302016-12-27T18:29:07+5:30
सोलापूरमधील सराफ व्यावसायिक रावसाहेब जाधव यांच्या पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूप्रकरणी सातारा येथील 12 पोलिसांना अटक करण्यात आली आहे.

रावसाहेब जाधव हत्येप्रकरणी 12 पोलीस अटकेत
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर दि. 27 - सोलापूरमधील सराफ व्यावसायिक रावसाहेब जाधव यांच्या पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूप्रकरणी सातारा येथील 12 पोलिसांना अटक करण्यात आली आहे.
जेऊर, ता. करमाळा येथे सराफा व्यापार करणाऱ्या जाधव यांना चोरीचे सोने विकत घेतल्याच्या संशयावरून सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तसेच त्याची कोणतीही खबर करमाळा पोलिसांना न देता जाधव यांना साताऱ्यात आणून चौकशी चालवली होती. दरम्यान जाधव यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. पोलिसांनी कोठडीत केलेली मारहाण आणि दिलेल्या त्रासामुळे जाधव यांचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे.