शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

११० टक्के भरलेला प्रकल्प मायनसमध्ये; उजनी जलाशयाचं रूपांतर झालं चक्क तळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 14:59 IST

धरण परिसराला आलं जणू वाळवंटाचं स्वरूप; २५ वर्षात प्रथमच तिबार पपिंगची पाळी; पाणी नियंत्रण समिती नेमण्याची मागणी

ठळक मुद्देउजनीची एकूण पाणीपातळी आजघडीला ४५८.१३० मीटरवर खालावली गेल्या वर्षी आजच्या दिवशी उजनीची पाणी क्षमता वजा १९.८८ टक्के होतीसोलापूरला पाणीपुरवठा करणाºया पाईपलाईन तसेच तिबार पंपिंगद्वारे पाणीपुरवठा केला जातोय

प्रदीप पाटील / नासीर कबीरकरमाळा/ भीमानगर : उजनी धरणाचे तळ्यात रूपांतर झाले असून, जून महिना संपत आला तरीही धरण परिक्षेत्रात अद्याप पाऊस पडला नाही. त्यामुळे या धरणाला वाळवंटाचे स्वरूप आले आहे. उजनीची अवस्था खूपच वाईट झाली असून, उजनीच्या पाण्याचे नियोजन व्यवस्थित न केल्यामुळे ११० टक्के भरलेल्या उजनी धरणाची अवस्था अशी झाली आहे.

पावसाळी अधिवेशनादरम्यान पुणे व सोलापूर जिल्ह्यातील आमदारांनी याविषयी तक्रारींचा सूर उठवला. अधिकारी वर्गावर नाराजी व्यक्त केली. पाणी नियोजन न केल्यामुळे आज उजनीची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. उजनीच्या इतिहासात कधी नव्हे ते मायनस ५८.६१ टक्क्यांपर्यंत धरण गेले आहे. बोगदा व कालवाकाठची पिके अखेरच्या घटका मोजत आहेत.  गावागावांमध्ये पाणी आणि चाºयावाचून शेतकºयांवर जनावरे विकण्याची वेळ आली आहे. उजनी धरण काठच्या शेतकºयांचे हाल तर न विचारलेलेच बरे ! आज पाऊस पडेल.. उद्या पाऊस पडेल़़़ या भोळ्या आशेवर विसंबून राहिलेला शेतकरी पाईप लांबवून व विद्युत मोटारी वाढवून जीव मेटाकुटीला आला आहे.

धरणाची आजची स्थिती- उजनीची एकूण पाणीपातळी आजघडीला ४५८.१३० मीटरवर खालावली आहे. एकूण पाणीसाठा ९१३.६२ दलघमी, उपयुक्त पाणीसाठा वजा ८८९.१९ दलघमी, तर टक्केवारी वजा ५८.६१ टक्क्यांवर पोहचली आहे. एकूण टीएमसी पाणीसाठा ३२.२६, उपयुक्त टीएमसी वजा ३१.४० पर्यंत गेला आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी उजनीची पाणी क्षमता वजा १९.८८ टक्के होती.

- सोलापूरला पाणीपुरवठा करणाºया पाईपलाईन तसेच तिबार पंपिंगद्वारे पाणीपुरवठा केला जातोय. पाईपलाईन अस्तित्वात आल्यापासून गेल्या पंचवीस वर्षांत पहिल्यांदाच तिबार पंपिंगद्वारे पाणीपुरवठा करण्याची पाळी आली आहे. येणाºया काळात तरी उजनीवर नियंत्रण ठेवायचे असेल तर त्यासाठी उजनी धरण पाणी नियंत्रण समिती नेमावी व तज्ज्ञ शेतक ºयांचा समावेश करावा जेणेकरून पाण्यावर व अधिकाºयांवर नियंत्रण आणता येऊ शकेल, अशी मागणी आता होऊ लागली आहे.

उजनीचे पाणलोट क्षेत्र उघडे पडल्याने शेतकºयांचे हालकरमाळा : उजनी धरणातील पाणीपातळी कमालीची घटल्याने करमाळा तालुक्यातील पाणलोट क्षेत्र उघडे पडले आहे. पुनर्वसित शेतकरी उभी पिके वाचविण्यासाठी लाखो रुपये खर्चून धरणाच्या पोटात चाºया घेऊन पाण्यासाठी धडपड करीत आहेत.करमाळा तालुक्यात ऊस, केळी, भाजीपाला, फळबागांचे क्षेत्र या पुनर्वसित भागात असून धरणातील पाणीपातळी यंदा कमालीची घटल्याने पुनर्वसित शेतकºयांना उभी पिके वाचविण्यासाठी शेतकºयांनी एकत्रित येऊन लाखो रुपये गोळा करून नदीपात्रात जेसीबी, पोकलेनद्वारा दीडशे ते दोनशे फुटांपर्यंत खोल चाºया खोदून पाणी घेण्याचा प्रयत्न केला आहे. वरचेवर पाणी कमी होत असल्याने शेतकºयांना पुन्हा चाºया खोदाव्या लागत आहेत. केबल, विद्युत मोटारी वारंवार हलवून मोठ्या मेहनतीने कसरत करीत दुबार, तिबार पंपिंंग करून शेतीत असलेल्या उभ्या पिकांना वाचविण्यासाठी पाणी द्यावे लागत आहे. तालुक्यातील पश्चिम भागात केत्तूर, वाश्ािंबे, पोमलवाडी, कात्रज, खातगाव, टाकळी, कोंढारचिंचोली, सोगाव, कंदर, वांगी, बिटरगाव, सांगवी, ढोकरी, दहिगाव, उम्रड, मांजरगाव, कुगाव, चिखलठाण, हिंगणी, उंदरगाव या भागातील शेतकरी रात्रंदिवस उजनी बॅकवॉटर भागात फिरून उभ्या  पिकांना वाचविण्यासाठी धडपड करीत आहेत. 

कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक शेतीत करून पदरात काहीच पडत नाही. धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी चिखलठाणचे रहिवासी व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांनी केली आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरwater transportजलवाहतूकUjine Damउजनी धरणSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका