दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी तारखा जाहीर; यंदा असणार 'असा' बदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 19:21 IST2024-08-12T19:06:47+5:302024-08-12T19:21:36+5:30
Maharashtra Board Exam: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दहावी-बारावीच्या परीक्षेबाबत मोठी घोषणा केली आहे.

दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी तारखा जाहीर; यंदा असणार 'असा' बदल
SSC-HSC Exam TimeTable :महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. दहावी-बारावीच्या परीक्षेच्या तारखा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील परीक्षांच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या कालावधीमध्ये यावेळी दहा दिवसांचा फरक असणार आहे. यानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ऐवजी ११ फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा १ मार्च ऐवजी २० मार्चपासून घेण्यात येणार आहे.
बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या काळात होणार आहे. तर, दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या काळात होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने प्रसिद्धीपत्रक जारी करुन दिली आहे. यासोबत राज्य शिक्षण मंडळाकडून हरकती आणि सूचना पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता यावे यादृष्टीने या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
निकालानंतर विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया महत्त्वाची असते. तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा या मंडळाच्या परीक्षेनंतर आयोजित केल्या जातात. त्यामुळे या परीक्षांचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळायला हवा तसेच पुरवणी परीक्षा लवकर घेवून त्याचा निकाल लवकर लागायला हवा यासर्व बाबींचा विचार करुन २०२४-२५ ची शैक्षणिक वर्षात होणारी दहावी-बारावीची परीक्षेच्या कालवधीत मोठा बदल करण्यात आलाय. एबीपी माझाच्या वृत्तानुसार, फेब्रुवारी-मार्चमध्ये होणारी दहावी आणि बारावीची परीक्षा नेहमीपेक्षा १८ ते १० दिवस घेण्याचा राज्य मंडळाचा मानस आहे.
असं असणार वेळापत्रक
बारावीची परीक्षा - मंगळवार, 11 फेब्रुवारी २०२५ ते मंगळवार, १८ मार्च २०२५
प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन : शुक्रवार, २४ जानेवारी २०२५ ते सोमवार १० फेब्रुवारी २०२५
दहावीची परीक्षा : शुक्रवार, २१ फेब्रुवारी २०२५ ते सोमवार १७ मार्च २०२५
प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन : सोमवार ३ फेब्रुवारी २०२५ ते गुरूवार २० फेब्रुवारी २०२५