शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

देशातील १०० टक्के वाहने बॅटरी संचलित करणार : चंद्रशेखर बावनकुळे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 14:21 IST

इंधनाचे साठे मर्यादित स्वरूपात आहेत. त्यामुळे पर्यायांचा शोध घेतला जात आहे.

ठळक मुद्देस्मार्ट सिटीच्या सौर उर्जा प्रकल्पाचे उद्घाटन एकदा बॅटरी चार्ज केली की वाहन किमान ४०० किलोमीटर गेले पाहिजे अशी क्षमता विद्यूत शक्तीवरील वाहनांचीही निर्मिती

पुणे: देशातील १०० टक्के चार चाकी वाहने विद्यूत शक्तीवर चालणारी अशी करायची आहेत. एकदा बॅटरी चार्ज केली की वाहन किमान ४०० किलोमीटर गेले पाहिजे अशी क्षमता तयार करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यातील प्रवास अत्यंत स्वस्त होईल, असे ऊर्जामंत्री चंद्रेशेखर बावनकुळे यांनी सांगितले. त्यासाठी देशभर चार्जिंग स्टेशन्सही तयार करण्यात येतील असे ते म्हणाले.पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनी व बाणेर येथील युथिका सोसायटी यांच्या वतीने सोसायटीमध्ये स्मार्ट सोलर प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन करताना बावनकुळे यांनी ही माहिती दिली. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप, आमदार मेधा कुलकर्णी, औंध बाणेर प्रभाग समितीचे अध्यक्ष अमोल बालवडकर, स्थानिक नगरसेविका स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर, अनिल किल्लोर, युथिका सोसायटीचे अध्यक्ष सुनित जोशी यावेळी उपस्थित होते. बावनकुळे म्हणाले, इंधनाचे साठे आता मर्यादित स्वरूपात आहेत. त्यामुळे पर्यायांचा शोध घेतला जात आहे. राज्यात तसेच देशातही सर्वत्र ३६५ दिवसांपैकी ३२८ दिवस चांगला सूर्यप्रकाश उपलब्ध असतो. त्याचा वापर करून सौर उर्जा तयार करण्यात येत आहे. त्याचा खर्चही आता कमी झाला आहे. त्याशिवाय विद्यूत शक्तीवरील वाहनेही तयार होत आहे. भविष्यात त्याचे प्रमाण वाढवण्यात येणार आहे.जगताप यांनी स्मार्ट प्रकल्पाची माहिती दिली. स्मार्ट सिटीमध्ये १० टक्के वीज ही अपारंपरिक ऊर्जास्त्रोतापासून तयार करणे अपेक्षित आहे. ते काम आता सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी या क्षेत्रातील तीन कंपन्यांबरोबर सामंजस्य करारही करण्यात आला आहे. बालवडकर यांनी स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांना नागरिकांचा सकारात्मक सहभाग मिळेल अशी ग्वाही दिली.

टॅग्स :Puneपुणेfour wheelerफोर व्हीलरElectric Carइलेक्ट्रिक कारMaharashtraमहाराष्ट्र