शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

साखर अधिभारात १०० रुपयांची वाढ

By admin | Updated: February 1, 2016 02:58 IST

साखरेवरील अधिभारात प्रतिक्विंटल शंभर रुपयांनी वाढ करून तो १२४ रुपये करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे साखरेच्या विक्रीवर प्रतिक्विंटल ७१ रुपये अबकारी

चंद्रकांत कित्तुरे, कोल्हापूरसाखरेवरील अधिभारात प्रतिक्विंटल शंभर रुपयांनी वाढ करून तो १२४ रुपये करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे साखरेच्या विक्रीवर प्रतिक्विंटल ७१ रुपये अबकारी कर आणि १२४ रुपये अधिभार, असे १९५ रुपये कराच्या रुपाने आकारले जाणार आहेत. सोमवारपासून निर्णयाची अंमलबजावणी करणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.कराची रक्कम केंद्राच्या साखर विकास निधीत जमा होणार आहे. उपरोक्त निधीतून अडचणीतील साखर कारखान्यांना मदत, कारखान्यांचे विस्तारीकरण तसेच ऊस उत्पादकांना एफआरपीप्रमाणे दर देण्यासाठी अनुदान अथवा सवलतीच्या दराने कर्ज दिले जाते. सध्या साखरेच्या विक्रीवर प्रतिक्विंटल २४ रुपये अधिभार लावला जातो. तो २०० रुपयांपर्यंत वाढविण्याची तरतूद करणाऱ्या विधेयकाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी जानेवारी महिन्यातच मंजुरी दिली आहे. त्यानंतर साखरेच्या विक्रीवर प्रतिकिलो एक रुपया म्हणजेच प्रतिक्विंटल १०० रुपये अधिभार वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्याची अंमलबजावणी जानेवारी की फेब्रुवारीपासून करायची, याचा निर्णय झाला नव्हता. १ फेब्रुवारीपासून वाढीव अधिभार लागू करण्याचा निर्णय झाल्याचे साखर उद्योगातील विश्वसनीय सूत्रांनी रविवारी सांगितले. सोमवारीच त्याची घोषणा केली जाईल, असे सांगण्यात आले. साखर उत्पादन घटणारगेल्या साखर हंगामात साखरेचे विक्रमी २८० लाख टन इतके उत्पादन झाले होते. त्याचप्रमाणे जगभरातील साखर उत्पादनातही वाढ झाल्याने जागतिक पातळीवरच साखरेचे भाव कोसळले होते. परिणामी, अनेक कारखान्यांना उसाला एफआरपी इतकाही दर देणे कठीण बनले होते. देशाच्या अनेक भागात दुष्काळी स्थिती आहे. परिणामी, यंदा उत्पादन २६० टनांवर येईल, असा अंदाज ‘इस्मा’ या साखर उद्योगाच्या शिखर संघटनेने वर्तविला आहे.