शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

मद्यपी बाइकस्वारासह तिघांना १० हजारांचा दंड

By admin | Updated: July 30, 2016 02:31 IST

मद्यपान करून पहाटेच्या वेळी घरी परतणाऱ्या बाइकस्वार आणि काही तरुणांमध्ये मारहाण झाली. चौघांनीही मद्यधुंद अवस्थेत मारहाण केल्याने त्यांना अद्दल घडवण्यासाठी

मुंबई : मद्यपान करून पहाटेच्या वेळी घरी परतणाऱ्या बाइकस्वार आणि काही तरुणांमध्ये मारहाण झाली. चौघांनीही मद्यधुंद अवस्थेत मारहाण केल्याने त्यांना अद्दल घडवण्यासाठी उच्च न्यायालयाने तक्रारदार बाइकस्वारासह तीन जणांना प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम दोन आठवड्यांत पोलीस कल्याण निधीत जमा करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने या चारही युवकांना दिला आहे.१० जुलैच्या पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास मालवणी येथे राहणारे १८ ते २२ वयोगटातील युवक मद्यपान करून घरी परतत होते. त्याचवेळी त्यांच्या जवळून २८ वर्षीय युवक बाइकवरून जात होता. हा बाइकस्वारही मद्यधुंद अवस्थेत होता. या बाइकस्वाराबरोबर तिघे जण होते. तर रस्त्यावरून चालणाऱ्यांचाही पाच- सहा जणांचा गट होता. रस्त्यावरून चालणारे युवक बाइकस्वारांकडे लिफ्ट मागत होते. मात्र बाइकस्वारांनी लिफ्ट न दिल्याने या दोन्ही गटांत भांडण झाले. हे भांडण इतके विकोपास गेले, की या दोन्ही गटांत हाणामारी झाली. या मारामारीत २८ वर्षीय तरुण जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मालवणी पोलीस ठाण्याने तिघा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला. हा गुन्हा रद्द करण्यासाठी तिघांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. तक्रारदार आणि आमच्यात तडजोड झाली असल्याने आमच्यावरील एफआयआर रद्द करावा, अशी विनंती आरोपींनी केली. त्यांच्या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे होती.‘या वयोगटातील मुलांना अद्दल घडविण्याची गरज आहे. अशा प्रकारचे वर्तन सहन केले जाणार नाही, हा संदेश समाजात पोहोचविण्याची आवश्यकता आहे. पहाटे साडेतीन वाजता मद्यधुंद अवस्थेत बाइक चालवण्यात येते? अशी किती लोक आहेत? त्यामुळे त्यांनाही हे कळणे आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही तक्रारदारासह तिन्ही आरोपींना प्रत्येकी १० हजारांचा दंड ठोठावत आहोत,’ असे म्हणत उच्च न्यायालयाने या चौघांनाही दोन आठवड्यांत दंडाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करण्याचा आदेश दिला. (प्रतिनिधी)