सिंधुदुर्ग : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत जिल्ह्यात भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) महायुतीने निवडणुकीपूर्वीच बाजी मारली आहे. भाजपाचे चार जिल्हा परिषद सदस्य आणि सहा पंचायत समिती सदस्य तर शिंदेसेनेचा एक जिल्हा परिषद मिळून महायुतीचे तब्बल ११ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या ५० जागांसाठी आणि पंचायत समितीच्या १०० जागांसाठी ५ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू असून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी २७ जानेवारी हा शेवटचा दिवस आहे. उमेदवारांची छाननी झाल्यानंतर जिल्ह्यातील कणकवली विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य बिनविरोध होण्यास सुरूवात झाली असून पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या विरोधकांना निवडणूक निकालापूर्वीच चपराक दिली आहे.भाजपाने जिंकल्या १० जागाजिल्हा परिषद निवडणुकीत भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या महायुतीमध्ये भाजप ३१ जागा लढवित आहे. त्यापैकी आतापर्यंत ४ जिल्हा परिषद सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. यात खारेपाटण : प्राची ईस्वलकर, पडेल : सुयोगी रवींद्र घाडी, बापर्डे : अवनी अमोल तेली, बांदा : प्रमोद कामत यांचा समावेश आहे. तर पंचायत समितीमध्ये कणकवली वरवडे : सोनु सावंत, बिडवाडी : संजना राणे, देवगड तालुक्यातील पडेल : अंकुश यशवंत ठुकरूल, नाडण : गणेश सदाशिव राणे, बापर्डे :संजना संजय लाड आणि वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे : साधना सुधीर नकाशे असे सहा पंचायत समिती सदस्य बिनविरोध झाले आहेत.
एक जागा शिंदेसेनेलाशिंदेसेनेच्या कणकवली तालुक्यातील जानवली जिल्हा परिषद मतदारसंघातील रूहिता राजेश तांबे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यांच्या विरोधातील उद्धवसेनेच्या हेलन कांबळे यांनी अर्ज मागे घेतल्याने तांबे यांची बिनविरोध निवड होणार आहे.
Web Summary : In Sindhudurg ZP election, BJP, Shinde Sena, and NCP alliance secured 11 unopposed members. BJP won 10 seats, while Shinde Sena got one. Elections are for 50 ZP and 100 PS seats.
Web Summary : सिंधुदुर्ग ZP चुनाव में, बीजेपी, शिंदे सेना और एनसीपी गठबंधन ने 11 निर्विरोध सदस्य सुरक्षित किए। बीजेपी ने 10 सीटें जीतीं, जबकि शिंदे सेना को एक मिली। चुनाव 50 ZP और 100 PS सीटों के लिए हैं।