तहाणलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं कर्मचाऱ्याला महागात पडलं! वन विभागानं निलंबित केलं, नेमकं काय घडलं? बघा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 18:22 IST2025-04-06T18:18:34+5:302025-04-06T18:22:20+5:30
या कर्मचाऱ्याचे नाव सत्यनारायण गुर्जर असे आहे. ते कूनो नॅशनल पार्कमध्ये चीत्ता मित्र म्हणून कार्यरत होते. ते वन विभागात ड्रायव्हर म्हणून काम करत होते....

तहाणलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं कर्मचाऱ्याला महागात पडलं! वन विभागानं निलंबित केलं, नेमकं काय घडलं? बघा VIDEO
मध्य प्रदेशातील शेओपूर येथील कुनो राष्ट्रीय उद्यानात तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणे वन विभागाच्या एका कर्मचाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. एवढे महागात की, त्याला त्याची नोकरी गमवावी लागली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्याला तातडीने निलंबित केले आहे. "चित्त्यांच्या एवढे जवळ जाणे, हे वन्यजीव संवर्धन नियमांच्या विरुद्ध आहे. यामुळे त्याच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकला असता," असे संबंधित अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
कूनो नॅशनल पार्कमध्ये चीत्ता मित्र म्हणून होते कार्यरत -
या कर्मचाऱ्याचे नाव सत्यनारायण गुर्जर असे आहे. ते कूनो नॅशनल पार्कमध्ये चीत्ता मित्र म्हणून कार्यरत होते. ते वन विभागात ड्रायव्हर म्हणून काम करत होते. व्हायरल व्हिडिओमध्ये काही चित्ते झाडाखाली शांतपणे बसलेले दिसत आहे. तेवढ्यात गुर्जर हे हातात पाण्याची कॅन घेऊन तेथे पोहोचतात आणि एका थाळीमध्ये त्या चित्त्यांना पाणी देऊ लागला. पाणी पिण्यासाठी हे चित्ते त्या व्यक्तीच्या अगदी जवळ येतात आणि पाणी पिऊ लागतात. विशेष म्हणजे, सत्यनारायण गुर्जर हे साधारणपणे केवळ दीड मीटर अंतरावरून बिबट्यांना पाणी देताना दिसत आहेत.
खतरों के खिलाड़ी....#VideoViral कूनो नेशनल पार्क का है। प्यासे चीतों को पानी पिला रहे यह शख्स सत्यनारायण गुर्जर हैं। विभाग ने इन्हें सस्पेंड कर दिया है। pic.twitter.com/bjY9iDRt9g
— sonelal.kushwaha (@KushwahaK45286) April 6, 2025
इतर अधिकाऱ्यांवरही कारवाई होण्याची शक्यता -
एवढेच नाही तर वन विभाग या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. इतर अधिकाऱ्यांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे. कुनो राष्ट्रीय उद्यानात परदेशातून चित्ते आणण्यात आले आहेत. या उद्यानात त्यांचे संवर्धन केले जात आहे. हे उद्यान वन्यजीव संवर्धनासाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे. उद्यानात वन्यजीवांशी कोणत्याही प्रकारचा संपर्क प्रतिबंधित आहे.