काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून महिला सरपंचावर बलात्कार, प्रतिक्रिया देताना आमदार म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 15:22 IST2023-07-21T15:20:52+5:302023-07-21T15:22:05+5:30
Madhya Pradesh News: एका महिला सरपंचावर बलात्कार झाल्याने खळबळ उडाली आहे. या बाबत पीडित महिला सरपंचाने स्थानिक पोलिसांत तक्रार नोंदवली असून, गुन्हा दाखल करून घेत तपासाला सुरुवात केली आहे.

काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून महिला सरपंचावर बलात्कार, प्रतिक्रिया देताना आमदार म्हणाले...
मध्य प्रदेशमधील मंडला येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिला सरपंचावर बलात्कार झाल्याने खळबळ उडाली आहे. या बाबत पीडित महिला सरपंचाने स्थानिक पोलिसांत तक्रार नोंदवली असून, गुन्हा दाखल करून घेत तपासाला सुरुवात केली आहे. मात्र या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसच्या आमदारांनी अजब वक्तव्य केलं आहे. ही घटना पीडिता आणि आरोपीमधील वैयक्तिक बाब आहे. तसेच प्रकरणाचा तपास सुरू आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला सरपंचाने दुसऱ्या गावातील महिला सरपंचांच्या पतीवर बलात्काराचा आरोप केला आहे. या महिला सरपंचाने केलेल्या आरोपांमुळे पोलीस आणि प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. तक्रार मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. पीडित महिला सरपंचाने प्रेम सिंह धुर्वे यांच्यावर हा सनसनाटी आरोप केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडित महिला सरपंच आणि आरोपी प्रेम सिंह धुर्वे हे दोघेही ब्लॉक काँग्रेस कमिटीमध्ये पदाधिकारी आहेत. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेस आमदारांची धक्कादायक प्रतिक्रिया समोर आली आहे. काँग्रेस आमदार अशोक मर्सकोले या बाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले की, हा विषय पीडित महिला सरपंच आणि आरोपी प्रेम सिंह धुर्वे या दोघांमधील वैयक्तिक विषय आहे. या प्रकाराचा अधिक तपास सुरू आहे.