असदुद्दीन ओवेसींच्या AIMIM ला झटका! एकमेव हिंदू महिला नगरसेवकाचा राजीनामा, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 21:36 IST2025-07-15T21:35:31+5:302025-07-15T21:36:09+5:30
यासंदर्भात पत्रकारांसोबत बोलताना अरुणा उपाध्याय म्हणाल्या, आपण राजीना दिला असला तरी कुठल्याही इतर पक्षात जाणार नाही. तर खरगोन नगर परिषदेतील एक स्वतंत्र नगरसेवक म्हणून काम करत राहू.

असदुद्दीन ओवेसींच्या AIMIM ला झटका! एकमेव हिंदू महिला नगरसेवकाचा राजीनामा, नेमकं काय घडलं?
मध्य प्रदेशातील खरगोन येथे धर्मांतराला प्रोत्साहन देत असल्याच्या आरोपांमुळे त्रस्त होऊन, असदुद्दीन ओवैसी यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाच्या एकमेव हिंदू महिला नगरसेवक अरुणा उपाध्याय यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी हैदराबाद येथील एआयएमआयएमच्या केंद्रीय कार्यालयाला राजीनामा पत्र पाठवले आहे.
अरुणा उपाध्याय यांनी, हैदराबाद येथील एआयएमआयएमच्या केंद्रीय कार्यालयाला 14 जुलैरोजी पाठवलेल्या पत्रात, आपण वैयक्तिक कारणास्तव कोअर कमिटी आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहोत, असे म्हटले आहे.
यासंदर्भात पत्रकारांसोबत बोलताना अरुणा उपाध्याय म्हणाल्या, आपण राजीना दिला असला तरी कुठल्याही इतर पक्षात जाणार नाही. तर खरगोन नगर परिषदेतील एक स्वतंत्र नगरसेवक म्हणून काम करत राहू.
म्हणून दिला राजीनामा -
त्या पुढे म्हणाल्या, धर्मांतरण आणि छळाच्या आरोपांना कंटाळून आपण राजीनामा दिला आहे. महत्वाचे म्हणजे, अरुणा यांचे पती तथा इतर काही लोकांनी त्यांच्यावर लोकांचे इस्लाम धर्मात धर्मांतरण केल्याचा आरोप केला होता.
मुस्लीम बहुल भागातून जिंकली होती निवडणूक -
अरुणा यांनी 2022 च्या नगर पंचायत निवडणुकीत विजय मिळवला होता. त्यांच्या विजयाने सर्वांचे लक्ष वेधले होते. कारण त्या 70 टक्के मुस्लीम लोकसंख्या असलेल्या वॉर्ड क्रमांक देन मधून विजयी झाल्या होत्या. या निवडणुकीत एआयएमआयएमच्या तिकिटावर ज्या चार उमेदवारांनी विजय मिळवला होता. त्यांपैकी एक अरुणा उपाध्यायही होत्या.