चित्त्यांचा मृत्यू 'या' जीवघेण्या संसर्गामुळे, 'धात्री'च्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 20:06 IST2023-08-04T20:04:36+5:302023-08-04T20:06:45+5:30
Wild Life News. कुनो राष्ट्रीय उद्यानात आतापर्यंत 9 चित्त्यांचा मृत्यू झाला आहे.

चित्त्यांचा मृत्यू 'या' जीवघेण्या संसर्गामुळे, 'धात्री'च्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून खुलासा
Kuno Cheetah Death : भारतातून नामशेष झालेल्या चित्त्याच्या पुनर्वसनासाठी मध्य्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्ता प्रकल्प सुरू करण्यात आला, पण यातील बहुतांश चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. नुकत्याच मृत्यू झालेल्या मादी चित्ता 'धात्री'च्या पोस्ट मॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. धात्रीचा मृत्यू अळ्यांच्या संसर्गामुळे झाला आहे. हा संसर्ग इतर चित्यांमध्येही पसरण्याची शक्यता आहे.
पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मादी बिबट्याला फ्लाय लार्व्हा संसर्ग झाल्याचे सांगण्यात आले आहे. धात्रीच्या शरीरात अळ्या आढळल्या. आरोग्य तपासणीसाठी आणण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, चित्त्यांच्या गळ्यातील रेडिओ कॉलरमुळे चित्त्यांना हा संसर्ग होत आहे. इतर चित्त्यांच्या मृत्यूमागेच हेच कारण सांगण्यात येत आहे.
दरम्यान, कुनो व्यवस्थापनाने उर्वरित चित्त्यांच्या गळ्यातून रेडिओ कॉलर काढले असून, त्यांच्या आरोग्य तपासणीचे कामही सुरू करण्यात आले आहे. बेपत्ता मादी चित्ता नीरवा अद्याप सापडली नाही, तिचा शोधही घेतला जात आहे. नीरवा जिवंत सापडावी, यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत.