अधिकारी होण्यासाठी सुरू केला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास; वर्गातच Heart Attack ने झाला मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 18:28 IST2024-01-18T18:26:59+5:302024-01-18T18:28:04+5:30
Indore Heart Attack Case: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या 18 वर्षीय विद्यार्थ्याचा अवघ्या काही मिनिटात मृत्यू.

अधिकारी होण्यासाठी सुरू केला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास; वर्गातच Heart Attack ने झाला मृत्यू
इंदूर: मागील काही काळापासून हर्ट अटॅकच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशाप्रकारच्या घटनांचे व्हिडिओही सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असतात. ताजे प्रकरण मध्य प्रदेशच्या इंदूरमधून समोर आले आहे. एमपीपीएससीची तयारी करणारा करणाऱ्या एका 18 वर्षीय विद्यार्थ्याचा वर्गातच हृदयविकाराच्या घटक्याने मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना भंवरकुआन येथील कोचिंग सेंटरमधली आहे. राजा लोधी(18) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो सागर येथील रहिवासी असून, इंदूरमध्ये भाड्याने खोली करुन राहायचा. राजाला अधिकारी व्हायचे होते, यासाठी तो इंदूरमध्ये एमपीपीएससीची तयारी करायचा. 17 जानेवारी रोजी तो नेहमीप्रमाणे कोचिंगला गेला. दुपारपर्यंत पूर्णपणे बरा होता. पण, वर्गात अचानक त्याला छातीत दुखू लागले.
18 y/o boy got heart attack while sitting in coaching class in Indore😢
— If (@pioneerbhatt) January 18, 2024
This is scary
pic.twitter.com/jbwLpJWBQF
अवघ्या काही वेळात राजा खाली पडला. यानंतर त्याच्या मित्रांनी घाईघाईने त्याला दवाखान्यात नेले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, त्या विद्यार्थ्याच्या घरात शोककळा पसरली आहे.