शहरं
Join us  
Trending Stories
1
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
2
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
3
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
4
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
5
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
6
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
7
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
8
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
9
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
10
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
11
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
12
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
13
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
14
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
15
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
16
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
17
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
18
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
19
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
20
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई

"बारावीला ७० टक्क्यांपेक्षा अधिक मार्क असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 5:55 PM

मध्य प्रदेश सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि मजबूत बनवण्यासाठी ह्या योजनेची सुरुवात केली आहे.

भोपाळ - केंद्र आणि राज्य सरकारकडून महिला वर्गासाठी नवनवीन योजना राबवण्यात येत असतात. नुकतेच केंद्र सरकारच्या बजेटमध्येही महिलांसाठी काही विशेष योजना लागू करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये, महिलांसाठी मुदत ठेव रकमची योजनाही लागू करण्यात आलीय. तर, विविध राज्य सरकार वेगवेगळ्या योजना आणतात. आता, मध्य प्रदेश सरकारने महिलांना दरमहा १००० रुपये देण्याची योजना सुरू केलीय. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याहस्ते आज मध्य प्रदेशात 'लाडली बहन योजना' सुरू झाली असून लाभार्थी महिलांना पैशाचे वाटपही करण्यात आले. विशेष म्हणजे याच कार्यक्रमात चौहान यांनी १२ वी पास विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणाही केली.

मध्य प्रदेश सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि मजबूत बनवण्यासाठी ह्या योजनेची सुरुवात केली आहे. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या महिलांसाठी ही योजना सुरू करण्यात येत आहे. त्यानुसार, महिलांना दरमहा १ हजार रुपये रक्कम थेट अकाऊंटवर मिळणार आहे. धार जिल्ह्यातील मोहनखेडा येथे लाडली बहन योजनेचं महासंमेलन भरवण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमात मुख्यमंत्री चौहान यांनी १२ वी पास विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या.  

मी मुला-मुलींनाही मदत करणार, कारण तेही माझे भाच्चे आहेत. म्हणून मी आज घोषणा करतो की, ज्या विद्यार्थ्यांना १२ वीच्या परीक्षेत ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण आहेत, त्या विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देण्यात येतील. २६ जुलै रोजी हा कार्यक्रम राबविण्यात येईल, असे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले. तसेच, बारावीच्या परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावलेल्या मुलास आणि मुलीस तुमचा मामा स्कुटी देणार, तसेच ५ वी आणि ९ वीच्या शिक्षणासाठी गाव सोडून दुसऱ्या गावात जावं लागणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकल खरेदी करण्यासाठी साडे चार हजार रुपयांचा निधी दिला जाईल, असेही चौहान यांनी सांगितले. 

दरम्यान, आज मध्य प्रदेशमधील १.२५ कोटींपेक्षा अधिक महिला भगिनींना या योजनेचा लाभ मिळाला आहे. या महिलांच्या खात्यात १-१ हजार रुपयांचा दुसरा हफ्ता पाठविण्यात आला आहे. २५ जुलैपासून पुन्हा एकदा या योजनेसाठी महिलांचे अर्ज भरुन घेतले जाणार आहेत.    

लाडली बहन योजना कुणासाठी?

केवळ मध्य प्रदेशच्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येईलअर्ज करण्यासाठी महिलांचे वय २३ वर्षांपेक्षा कमी आणि ६० वर्षांपेक्षा अधिक नसावेशाळा किंवा कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. ही विशेष योजना केवळ इतर मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील महिलांसाठीच आहे१० जूनपासून या योजनेतून थेट बँकेत पैसे जमा होणार आहेतअर्ज जमा करुन घेण्यासाठी अधिकाऱ्यांची टीम गावोगावी जाईल. 

अर्जासाठी काय लागतील कागदपत्रे

१. आधार कार्ड२. पासपोर्ट साइज  फोटो३. बँक खातेची डीटेल्स४. मोबाइल नंबर५. रहिवाशी दाखला६. जन्म दाखला

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालMadhya Pradeshमध्य प्रदेशChief Ministerमुख्यमंत्रीlaptopलॅपटॉप