ईव्ही चार्जिंग पॉइंटमध्ये स्फोट; ८ जण जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 11:38 IST2026-03-19T11:38:24+5:302026-03-19T11:38:41+5:30

घरातील १० सिलिंडरपैकी काहींचा उडाला भडका

Explosion at EV charging point; 8 killed on the spot | ईव्ही चार्जिंग पॉइंटमध्ये स्फोट; ८ जण जागीच ठार

ईव्ही चार्जिंग पॉइंटमध्ये स्फोट; ८ जण जागीच ठार

इंदूर  : इंदूरमध्ये व्यावसायिकाच्या तीन मजली घराबाहेर इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) चार्जिंग पॉईंटच्या ठिकाणी बुधवारी  पहाटे स्फोट झाला. त्यामुळे लागलेल्या भीषण आगीत कुटुंबातील ८ जणांचा होरपळून मृत्यू झाला. त्यात दोन मुले, तीन स्त्रियांचा समावेश आहे. या घरात साठा केलेल्या १० ते ११ सिलिंडरचाही स्फोट झाले. 

आगीतून घरातील अन्य तीन जणांची सुटका करण्यात बचावपथकांना यश मिळाले आहे. या आगीची चौकशी करण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने एक समिती नेमली आहे. ईव्ही चार्जिंगसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे आदेशही राज्य सरकारने दिले आहेत.

इलेक्ट्रॉनिक लॉक असल्याने दरवाजे उघडण्यात अडचणी
इंदूर येथे आग लागलेल्या घराच्या दरवाजांना इलेक्ट्रॉनिक लॉक होते. आगीमुळे विद्युतपुरवठा बंद झाल्यानंतर दरवाजाचे लॉक उघडून घरात प्रवेश करण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान, पोलिसांना अनेक अडचणी आल्या.
दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. मृतांच्या वारसदारांना २ लाख, जखमींना ५० हजार रुपये देण्याची त्यांनी घोषणा केली. मध्य प्रदेशचे गृहनिर्माण मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. तिथे झालेल्या अग्नितांडवाबद्दल मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही शोक व्यक्त केला.

Web Title : इंदौर में ईवी चार्जिंग पॉइंट विस्फोट, आठ की मौत

Web Summary : इंदौर में ईवी चार्जिंग पॉइंट में विस्फोट से आग लगी, जिसमें बच्चे और महिलाओं सहित आठ लोगों की मौत हो गई। दस गैस सिलेंडर भी फटे। बचाव दल ने तीन को बचाया। इलेक्ट्रॉनिक लॉक से प्रवेश में बाधा आई। सरकार ने जांच के लिए समिति बनाई। पीएम मोदी ने पीड़ितों के लिए मुआवजे की घोषणा की।

Web Title : EV Charging Point Explosion in Indore Kills Eight

Web Summary : Indore: An EV charging point explosion ignited a fire, killing eight, including children and women. Ten gas cylinders also exploded. Rescue teams saved three. Electronic locks hindered entry. Government forms a committee to investigate and create EV charging guidelines. PM Modi announced compensation for victims.