हाणामारीत कार्यकर्त्याचा मृत्यू; उमेदवाराविरोधात दाखल झाला गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 06:21 IST2023-11-21T06:20:35+5:302023-11-21T06:21:10+5:30

राज्यात शुक्रवारी मतदानावेळी छतरपूर जिल्ह्यातील राजनगर मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती.

death of worker; A case has been filed against the candidate | हाणामारीत कार्यकर्त्याचा मृत्यू; उमेदवाराविरोधात दाखल झाला गुन्हा

हाणामारीत कार्यकर्त्याचा मृत्यू; उमेदवाराविरोधात दाखल झाला गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
छतरपूर : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीवेळी कार्यकर्त्याच्या मृत्यूप्रकरणात काँग्रेस आणि भाजप उमेदवारांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सोमवारी याबाबत माहिती दिली.

राज्यात शुक्रवारी मतदानावेळी छतरपूर जिल्ह्यातील राजनगर मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. त्यात सलमान खान नामक काँग्रेस कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता. काँग्रेस नेते द्विग्विजय सिंह यांनी ही हत्या असल्याचा आरोप केला. घटनेनंतर पोलिसांनी भाजप उमेदवार अरविंद पटेरिया आणि २० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष नीरव चतुर्वेदी यांच्या तक्रारीनंतर काँग्रेस उमेदवार विक्रम सिंह यांच्यासह अन्य ८ जणांविरोधातही गुन्हा दाखल केला. तक्रारीवरून दोन्ही उमेदवारांविरोधात गुन्हा दाखल केला असून अद्याप तपास सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अमित संघ यांनी दिली.

Web Title: death of worker; A case has been filed against the candidate