कुनो राष्ट्रीय उद्यानातील ‘शौर्य’चा मृत्यू; आतापर्यंत 10 चित्ते मरण पावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 19:11 IST2024-01-16T19:10:16+5:302024-01-16T19:11:09+5:30
शौर्यच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आले नाही.

कुनो राष्ट्रीय उद्यानातील ‘शौर्य’चा मृत्यू; आतापर्यंत 10 चित्ते मरण पावले
Kuno National Park:मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिबियातून आणलेल्या आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत दहा चित्ते मृत्यूमुखी पडले आहेत. 'शौर्य' नावाच्या चित्त्याचा मृत्यू झाला असून, त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आले नाही. सकाळी 11 वाजता वनविभागाच्या पथकाला शौर्य बेशुद्धावस्थेत आढळला, त्याला उपचारासाठी आणण्यात आले, मात्र त्याचा जीव वाचू शकला नाही.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच कुनोमध्ये एका मादी चित्त्याने तीन पिलांना जन्म दिला होता. ही सर्वांसाठी मोठी आनंदाची बाब होती. चित्त्यांच्या मृत्यूचे सत्र थांबेल, अशी आशा अनेकांना होती, पण आज या आनंदावर विर्झन पडले. शौर्य चित्त्याच्या मृत्यूचे कारण त्याच्या शवविच्छेदनानंतरच समजेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
आतापर्यंत 10 चित्त्यांचा मृत्यू
कुनो नॅशनल पार्कमध्ये आतापर्यंत विविध कारणांमुळे एकूण 10 बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडलेल्या 10 बिबट्यांमध्ये कुनो पार्कमध्येच जन्मलेल्या तीन पिल्लांचाही समावेश आहे.