६५ वर्षांचा रुग्ण पडला तरुण महिला डॉक्टरच्या प्रेमात, लगट करू लागला, घातली लग्नाची मागणी, अखेर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 20:27 IST2024-07-24T20:26:15+5:302024-07-24T20:27:04+5:30
Madhya Pradesh Crime News: मध्य प्रदेशमधील इंदूर येथून एक अजब प्रकरण समोर आलं आहे. येथे ६५ वर्षांचा एक ज्येष्ठ नागरिक २५ वर्षांच्या तरुण महिला डॉक्टरच्या प्रेमात पडला. एकतर्फी प्रेमातून तो दररोज कुठलं ना कुठलं निमित्त काढून तिचा पिच्छा पुरवू लागला. अखेरीस वैतागलेल्या महिला डॉक्टरनं पोलिसांकडे तक्रार दिली.

६५ वर्षांचा रुग्ण पडला तरुण महिला डॉक्टरच्या प्रेमात, लगट करू लागला, घातली लग्नाची मागणी, अखेर...
मध्य प्रदेशमधील इंदूर येथून एक अजब प्रकरण समोर आलं आहे. येथे ६५ वर्षांचा एक ज्येष्ठ नागरिक २५ वर्षांच्या तरुण महिला डॉक्टरच्या प्रेमात पडला. एकतर्फी प्रेमातून तो दररोज कुठलं ना कुठलं निमित्त काढून तिचा पिच्छा पुरवू लागला. अखेरीस वैतागलेल्या महिला डॉक्टरनं पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत या रंगेल म्हाताऱ्याला अटक केली आहे. तसेच पोलीस त्याची अधिक चौकशी करत आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, हे प्रकरण संयोगितागंज पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील आहे. आरोपी सलाउद्दीन खान हा आजारी होता. त्यावर उपचार करून घेण्यासाठी काही दिवसांपूर्वी तो एमवाय रुग्णालयात गेला होता. त्यावेळी एका २५ वर्षांच्या तरुण महिला डॉक्टरने त्याच्यावर उपचार केले होते. त्यानंतर सलाउद्दीन खान याला तिच्याविषयी आकर्षण वाटू लागलं. तो कुठला ना कुठला बहाणा बनवून तो त्या डॉक्टरकडे जाऊ लागला. सुरुवातीला या महिला डॉक्टरने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र एकेदिवशी या रुग्णाने हद्दच केली. त्याने या महिला डॉक्टरला प्रेमपत्र पाठवून लग्नाला मागणी घातली. त्यामुळे संतप्त झालेल्या महिला डॉक्टरने पोलिसांकडे तक्रार दिली.
संयोगिताजंग पोलीस ठाण्याचे प्रभारी सतीष पटेल यांनी सांगितले की, आरोपी वृद्ध महिला डॉक्टरला सातत्याने त्रास देत होता. त्याने महिला डॉक्टरला प्रेमपत्रही लिहिलं. आरोपीची मन:स्थिती बरोबर दिसत नाही आहे. डॉक्टरच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. तसेच त्याची चौकशी सुरू आहे. आरोपीने डॉक्टरला पहिल्यांदा रुग्णालयात पाहिल्यापासून तो तिच्या मागे लागला होता. तसेच तो कुठला ना कुठला बहाणा बनवून सदर महिला डॉक्टरशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली.