शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
2
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
3
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
4
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
5
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
6
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
7
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
8
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
9
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
10
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
11
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
12
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
13
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
14
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
15
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
16
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
17
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
18
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
19
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
20
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

बेडरूमसाठी बेडशीट खरेदी करताय?; या गोष्टी लक्षात घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 18:25 IST

दिवसभराच्या थकव्यानंतर घराची ओढ प्रचंड जाणवते. घरी जाऊन कधी एकदा आराम करतोय असं होतं. एकदा का घरी गेलं आणि बेडवरती जाऊन पडलं की दिवसभराचा सगळा थकवा निघून जातो.

दिवसभराच्या थकव्यानंतर घराची ओढ प्रचंड जाणवते. घरी जाऊन कधी एकदा आराम करतोय असं होतं. एकदा का घरी गेलं आणि बेडवरती जाऊन पडलं की दिवसभराचा सगळा थकवा निघून जातो. अशातच बेड आणि बेडवरती असलेलं बेडशीट जर व्यवस्थित असेल तर आणखी आरामदायी वाटतं. आपण एकदा बेडवर बेडशीट वापरलं तर ते आपण लगेच धुण्यासाठी काढत नाही. काही दिवस ते तसचं असतं. त्यामुळे बेडशीट खरेदी करताना काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं असतं. जाणून घेऊया बेडशीट खरेदी करताना लक्षात घेण्याच्या काही टिप्स...

1. अनेकदा आपण बेडशीट घेतना ते दिसायला कसं दिसतं याकडे लक्ष देतो आणि त्यानंतरच खरेदी करतो. चांगलं दिसणारं बेडशीट चांगलं असेलच असं नाही. खासकरून एक गोष्ट लक्षात घ्या की, बेडशीट खरेदी करताना वातावरणाचाही अंदाज घ्या. 

2. जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये बेडशीट घेण्याचा विचार करत असाल तर कॉटनचं बेडशीट उत्तम ठरतं. तेच थंडीमघ्ये सिल्क, लेनिनच्या बेडशीटचा वापर करा. 

3. बेडशीट खरेदी करताना साइजकडे लक्ष द्या. खासकरून कॉटनचं बेडशीट घेताना याकडे लक्षं द्या. कारण कॉटनचं बेडशीट धुतल्यानंतर आकसतं. कॉटनमध्येही वेगवेगळ्या वरायटीचे बेडशीट्स असतात. 

4. ज्या बेडशीट्सचा दररोज वापर करण्यात येतो, त्यांच्यावर रिकल पडतात. त्यामुळे दररोज वापरण्यात येणारे बेडशीट्स विकत घेताना ते रिकल फ्री असतील आणि ते धुण्यासाठी सोपे असतील याची काळजी घ्या. 

5. बेडशीटचा रंग आणि लूक बेडरूमला सुंदर बनवतं. त्यामुळे बेडरूमचा कलर लक्षात घेऊन बेडशीट निवडा. बेडशीट बेडरूमला मॅचिंग झाल्याने बेडरूमची शोभा आणखी वाढते. 6. बेडशीट कोणच्या बेडरूमसाठी खरेदी करत आहात यावरून तुम्ही त्याची फ्रिंट डिसाइड करू शकता. म्हणजे, जर तुम्ही मुलांच्या बेडरूमसाठी खरेदी करत असाल तर अ‍ॅनिमल फ्रिंट तसेच मोठ्यांच्या बेडरूमसाठी बेडशीट घेत असाल तर फ्लोरल फ्रिंट असलेले बेडशीट्स खरेदी करू शकता. 

टॅग्स :Home Applianceहोम अप्लायंस