शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

त्वचा आणि केसांच्या काळजीसाठी चंदन, त्वचेच्या समस्यांवर रामबाण उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 2:36 AM

आपल्या सुगंधी गुणधमार्मुळे चंदनाच्या झाडाची ओळख प्राचीन काळापासून आहे. या झाडापासून मिळविलेले तेल त्यातल्या समृद्ध, उष्म सुगंधामुळे फार पूर्वीपासून वापरात आहे.

- अमित सारडा, वेलनेस अँड ब्युटी एक्स्पर्टआपल्या सुगंधी गुणधमार्मुळे चंदनाच्या झाडाची ओळख प्राचीन काळापासून आहे. या झाडापासून मिळविलेले तेल त्यातल्या समृद्ध, उष्म सुगंधामुळे फार पूर्वीपासून वापरात आहे. अनेक घरगुती उपचारांसाठी आणि त्वचेचे दोष दूर करण्यासाठी चंदनाचा वापर केला जातो. परफ्युम्स, पावडर्स, चेह-याला लावण्याच्या क्रीम्स आणि मास्क यांच्या निर्मितीतील चंदन हा एक प्रमुख घटक आहे. रसायनमुक्त असणारे हे नैसर्गिक उत्पादन त्वचेच्या समस्यांवर रामबाण उपाय आहे.चंदनामध्ये अ‍ॅरोमाथेरपीचे गुणधर्म निसर्गत:च आहेत आणि त्यापासून तयार केलेल्या तेलात जिवाणूविरोधी घटक आहेत. हे तेल त्वचेसाठी, तसेच केसांसाठी उपयुक्त आहे. साबणामध्ये चंदनाचा वापर केला असेल, तर त्यामुळे त्वचेवरील घाण, अस्वच्छ घटक नष्ट होतात, त्वचेची रंध्रे मोकळी होतात. त्वचा उजळते, त्वचेच्या पेशींना नवजीवन मिळते आणि मऊ, तेजस्वी त्वचा तुम्हाला प्राप्त होते. चंदनाच्या सौम्य, मनमोहक सुगंधाचे गुणधर्म त्यापासून तयार केलेल्या साबणातही उतरतात. त्यामुळे त्वचाही नितळ आणि कोमल राहते.मसाजसाठी वापरल्या जाणाºया तेलात चंदनाच्या तेलाचा वापर केला, तर तुमचा तणाव हलका करण्यास त्याचा लाभ होतो. त्यामुळे तुम्हाला तत्काळ ऊर्जा मिळते. मन आणि शरीराला शांती मिळते. हे तेल एक मॉइश्चरायझर म्हणूनही उपयुक्त ठरते. त्याशिवाय हे तेल तुमच्या त्वचेला जिवाणूविरोधी कवच मिळवून देते. त्यामुळे तुमची त्वचा तेजस्वी, आर्द्र, डागरहित आणि सुंदर होते. या तेलाचे काही थेंब आंघोळीच्या गरम पाण्यात टाकले असता, तजेल्याचा अनुभव येतो. तुमच्या आवडत्या बाथ सॉल्टमध्ये ते तेल मिसळावे. त्वचेच्या स्क्रबिंगसाठी ते फायदेशीर ठरते. त्वचा अधिक निरोगी दिसून येते.चंदनामुळे तुमच्या केसांचे नुकसान टळते आणि केसांना आतून ओलावा मिळतो. शॅम्पू बार वापरत असाल, तर संपूर्ण केसावर त्याचा बोटांनी थर पसरवा. आठवड्यातून दोन-तीन वेळा ही कृती केल्यास तुमचे केस अधिक आकर्षक होतील. त्यांना नवजीवन प्राप्त होईल.>साबणामध्ये चंदनाचा वापर केला असेल, तर त्यामुळे त्वचेवरील घाण, अस्वच्छ घटक नष्ट होतात, त्वचेची रंध्रे मोकळी होतात. त्वचा उजळते, त्वचेच्या पेशींना नवजीवन मिळते आणि मऊ, तेजस्वी त्वचा तुम्हाला प्राप्त होते. चंदनाच्या सौम्य, मनमोहक सुगंधाचे गुणधर्म त्यापासून तयार केलेल्या साबणातही उतरतात. त्यामुळे त्वचाही नितळ आणि कोमल राहते.