शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

Heath : मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव?... कारणं आणि उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2018 3:50 PM

कॉपर टी हेही मेनोरेजियाचं सर्वात महत्त्वाचे कारण असू शकते.

- डॉ. नेहा पाटणकर 

बाई पडल्या... बाई पडल्या... एकच गलका झाला. सुनीता मॅडम गणिताचे प्रमेय फळ्यावर सोडवत असताना चक्कर येऊन पडल्या होत्या. गेली ४० मिनिटं त्यांनी बरीच उदाहरणं सोडवली होती. त्यांना वर्गभर चालत शिकवण्याची सवय होती. पण, आज आल्यापासून त्या सतत उभ्याच होत्या आणि एका क्षणी चक्कर येऊन पडल्या.

डॉक्टरांकडे जाऊन तपासण्या वगैरे झाल्या. हिमोग्लोबिन कमी निघालं. चूक त्यांचीच होती. परीक्षा जवळ आल्या आहेत, अभ्यासक्रम संपवायचाय, घरातली जास्तीची कामं अशा सगळ्या कारणांनी डॉक्टरांकडे जायचं त्या पुढे ढकलत होत्या. मासिक पाळीच्या दिवसांत जास्त स्त्राव होत होता. गेले ३-४ महिन्यांपासून पाळीच्या दिवसांत दर दोन तासांनी पॅड बदलावं लागत असे. पाळी सात-आठ दिवस चालूच असायची. खूप मोठे 'क्लॉट्स' पडायचे. कधी कधी तर रात्रीचं पॅड बदलायलाही उठायला लागत होतं. पण, आज-उद्या करता-करता डॉक्टरांकडे जाणं लांबणीवर पडत गेलं आणि आज त्याची परिणती चक्कर येऊन कोसळण्यात झाली. हिमोग्लोबिन खूप कमी झाल्यामुळे चक्कर आली होती. गोळ्यांनी पटकन वाढलं नाही तर रक्त द्यावं लागेल असंही डॉक्टर म्हणाले.

वरील गोष्ट थोड्या फार फरकाने अनेकींच्या बाबतीत होत असते. मासिक पाळीला खूप जास्त रक्तस्त्राव होणे ही एक बऱ्याच जणींची तक्रार असते. त्याला वैद्यकीय परिभाषेत 'मेनोरेजिया' म्हणतात. या रक्तस्त्रावामुळे थकवा येणे, ओटीपोटात दुखणे, पाठदुखी, दम लागणे असा सगळा त्रास सुरू होतो. 

मेनोरेजिया हे वेगवेगळ्या प्रकारच्या अंतर्गत आजारांचं दृश्य लक्षण असतं. काही प्रमुख कारणंः  १. फायब्रॉइड्स२. uterine polyps३. एन्डोमेट्रिओसिस४. हार्मोनल इम्बॅलन्स५. थायरॉईड प्रॉब्लेम्स६. PID म्हणजेच पेलविक इन्फलमेटरी डिसीज (प्रजननक्षम ऑर्गन्सचे आजार)    IUD/कॉपर टी हेही मेनोरेजियाचं सर्वात महत्त्वाचे कारण असू शकते.

हल्ली पाठदुखी, मानदुखीसाठी टपाटप पेनकीलर्स घेण्याची सवय असते. या गोळ्यांचा साईड इफेक्ट 'मेनोरेजिया' हा असू शकतो. काही कारणाने ब्लड थिनरससारखी औषधं घेत असतील तर त्याचा डोस कमी करावा लागतो.अगदी कॅन्सर आल्याची वर्दी सुद्धा मेनोरेजिया मार्फत होऊ शकते. मेनोरेजियामुळे येणारा थकवा, पाठदुखी, ओटीपोटात दुखणे, दम लागणे या लक्षणांमुळे नेहमीच्या दिनक्रमावर परिणाम होतो असे लक्षात आले तर ताबडतोब स्त्रीरोग तज्ज्ञाकडे जाऊन तपासणी करून घ्यायलाच हवी. तसेच वर्षातून एकदा तरी कंप्लिट ब्लड काऊंट (CBC), पॅप स्मिअर अशा चाचण्या करणे आवश्यक असते. शेवटी आपले आरोग्य चांगले ठेवणे आपल्याच हातात असतं. 

टॅग्स :Healthआरोग्य