लॉकडाऊनमध्ये इंटरनेट डेटा जास्त संपतोय का? डेटा वाचवण्यासाठी वापरा 'ही' ट्रिक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 04:27 PM2020-04-03T16:27:51+5:302020-04-03T16:29:30+5:30

अशावेळी बंद खोलीत आपला फोन सतत वापरण्याशिवाय कोणताही पर्याय लोकांना  नाही.

Lockdown : How to save mobile internet data myb | लॉकडाऊनमध्ये इंटरनेट डेटा जास्त संपतोय का? डेटा वाचवण्यासाठी वापरा 'ही' ट्रिक

लॉकडाऊनमध्ये इंटरनेट डेटा जास्त संपतोय का? डेटा वाचवण्यासाठी वापरा 'ही' ट्रिक

Next

कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून वाचता यावं यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे बरेच लोक घरी बसून  कंटाळले आहेत. कारण बाहेर फिरण्यासाठी किंवा कोणालाही भेटायला तुम्ही  जाऊ शकतं नाही. अशावेळी बंद खोलीत आपला फोन सतत वापरण्याशिवाय कोणताही पर्याय लोकांना  नाही. अनेक वेबसाईट्सने आपली सेवा फ्री द्यायला सुरूवात केली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर इंटरनेटचा वापर करत आहेत.

पण आता प्रोब्लेम असा आहे की सकाळपासून रात्रीपर्यंत इंटरनेटचा वापर केल्यामुळे डेटा लवकर संपत आहे. म्हणून पूर्ण दिवस इंटरनेट वापरा येत नाही. आज आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत. या उपायांचा वापर करून तुम्ही इंटरनेट डेटा वाचवू शकता. तुम्ही मोबाईल इंटरनेट, वाय-फाय  इतर कोणत्याही माध्यमातून इंटरनेट वापरत असाल तरी काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे.

१) गरज असेल  तेव्हढ्यात वेबसाईड्स ओपन करा.

२) खूप जास्त टॅब खोलू नका

३) व्हिडीओ स्ट्रिंमींग वेबसाईड्सपासून  लांब रहा.

४)व्हाट्सएप, फेसबुक मैसेंजरवर डिफॉल्ट डाऊनलोडिंग बंद करा

५) ऑनलाईन गेम खेळू नका

६) मोबाईलवर होत असलेली कामं डेस्कटॉप वर्जनमध्ये खोलू नका.

७) यू-ट्यूब किंवा इतर साईड्सवरून व्हिडीयो पाहत असाल तर क्वालिटी कमी ठेवा. मग डाऊनलोड करा.

८) जास्तीत जास्त वेळ तुम्ही सोशल मीडियाचा वाापर करत असाल तर ऑलो प्ले व्हिडीयो बंद करा, व्हिडीयो जास्त अपलोड करू  नका. या टिप्सचा वापर करा तर तुम्हाला  इंटरनेटचा वापर करत असाताना सुद्धा दिवसभर डाटा पुरेल आणि तुम्ही इन्जॉय करू शकता.

Web Title: Lockdown : How to save mobile internet data myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.