सध्या कोरोना व्हाययरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे लोकांना घरी बसण्याशिवाय पर्याय नाही. घरी बसून अनेकजण सर्वाधिक वेळ सोशल मीडियावर घालवत आहेत. सोशल मिडीयावर वेळ देत असताना तुम्ही तुमच्या महत्वाच्या कामांबाबत विचार केलाय का?

आज आम्ही तुम्हाला अशी काही तुमची काम सांगणार आहोत.  जी लॉकडाऊन संपायच्या आत  करायला हवीत. या कामांमुळे जॉब शोधायला सोपं जाईल. तुम्ही जर आर्थीक संकटात असाल तर यामुळे मदत होऊ शकते. महामारीमुळे जॉब जाऊ नये यासाठी काही गोष्टींची तयारी करणं गरजेचं आहे. 

आपलं लिंक्डईन प्रोफाईल अपडेट करा

फेसबुक, इंस्टाग्राम, ट्वीटर प्रोफाइल तुम्ही नेहमी अपडेट करतंच असाल, पण नोकरी मिळवून देत असलेल्या साईट्सवर तुम्ही आपलं प्रोफाईल अपडेट करायला हवं. त्यामुळे तुम्हाला एखादी संधी उपलब्ध होण्याची शक्यता असते. कारण कोरोनाच्या महामारीमुळे जॉब मिळणं कठीण होऊ शकतं. म्हणून तुमचा सिव्ही लिक्डंइन प्रोफाईवर अपडेट करा. जॉब व्यतिरिक्त इतर कंपनीची माहिती घ्या,  आपल्या बॉस सोबत नवीन आयडिया शेअर करा, स्वतःचा सिव्ही लेटेस्ट फोरमॅटनुसार तयार करा. 

 पेडिंग ईमेल्सना उत्तर द्या

काही दिवसांपासून कोरोना आणि लॉकडाऊनमुळे तुम्ही घरात अधिकवेळ लक्ष देत आहात. पण लॉकडाऊनच्या आधी कोणीतरी तुम्हाला महत्वाचे मेल पाठवले असतील. त्यामुळे अशा मेल्सना रिप्लाय करा. आधी जरी गडबडीत तुम्ही काही चुकीचं उत्तर दिल असेल तर आता त्यात सुधारणा करून घ्या. कारण लॉकडाऊन संपल्यानंतर तुम्हाला प्रोफेशनल लाईफ रुळावर आणण्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे. ( हे पण वाचा-लॉकडाऊनमध्ये इंटरनेट डेटा जास्त संपतोय का? डेटा वाचवण्यासाठी वापरा 'ही' ट्रिक)

 बॅकिंग,ऑफिसची महत्वाची कामं

आजकाल सगळेच लोक नेट बॅकिंने व्यवहार करतात. त्यामुळे बँका बंद असताना सुद्धा तुम्ही घरच्याघरी कामं करू शकता. जर शक्य नसेल तर महत्वाची कामं डायरीत नोट करून ठेवा.

सर्वाधिक लोक फायनेंशियल बजेट तयार करण्याचा विचार करतात. पण रोजच्या कामात व्यस्त असल्यामुळे ते आपलं बजेट अपडेट करू शकत नाही. आता तुमच्याकडे वेळच वेळ असल्यामुळे तुम्ही वर्षभराच्या बजेटचं पत्रक तयार करू शकता. हा प्लॅन भविष्यासाठी चांगला ठरणारा असेल. याशिवाय तुमची लहान मोठी काम राहिली असतील तर या लॉकडाऊनमध्ये पूर्ण करता येतील. ( हे पण वाचा-तुम्ही घरून काम करता? तासंतास बेडवर बसून काम करणं पडू शकतं महागात, कसे ते वाचा...)

Web Title: Important work you can finish in coronavirus lockdown myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.