तणावापासून लांब राहण्यासाठी 'या' पदार्थांचा आहारात करा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 09:38 AM2018-03-26T09:38:44+5:302018-03-26T09:38:44+5:30

तणावापासून दूर राहायचं असेल तर काही पदार्थांचा आहारात समावेश करणं उपयुक्त ठरेल. 

eat these food items to stay away from depression | तणावापासून लांब राहण्यासाठी 'या' पदार्थांचा आहारात करा समावेश

तणावापासून लांब राहण्यासाठी 'या' पदार्थांचा आहारात करा समावेश

Next

मुंबई- सध्याच्या धकाधकीच्या जीवनात लोकांमध्ये तणाव आणि डिप्रेशनची समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे. कामाच्या वाढत्या ताणाचा आपल्या जीवनशैलीवर परिणाम तर होतोच पण यामुळे खाण्यापिण्याच्या सवयीसुद्धा बदलतात. आपण सकाळचा नाश्ता,दुपारचं जेवण किंवा रात्रीचं जेवण चुकवलं तर त्याऐवजी बाहेरचं जंक फूड खातो. हे बाहेरचे पदार्थ खाताना काहीवेळासाठी चांगलं वाटतं पण जंक फूड, बेकरी फूड आणि जास्त सारखयुक्त पदार्थ आपल्यात नकारात्मक भावना वाढवत असतात. यामुळेच व्यक्तीच्या आयुष्यात तणाव वाढतो. त्यामुळे तणावापासून दूर राहायचं असेल तर काही पदार्थांचा आहारात समावेश करणं उपयुक्त ठरेल. 

1- चॉकलेट
चॉकलेट सगळ्यांनाच आवडतं असं नाही, पण चॉकलेट स्ट्रेस दूर करण्यासाठी मदत करतं. चॉकलेटमध्ये असणारं फिनाइलेथाइलामाइन तत्व डोक्याला आराम देतं. चॉकलेटमध्ये हाय फ्लेवनॉल असल्याने सौदर्यात भर पाडतं. पण योग्य प्रमाणात चॉकलेट खाणंच फायद्याचं आहे. त्याचा अतिरेकही होऊ नये. 20 ग्रॅम चॉकलेटमध्ये 150 कॅलेरीज असतात. ज्यामुळे वजनही वाढतं. 

2- अकरोड
राग शांत करण्यासाठी अकरोड फायद्याचं आहे. अकरोडमध्ये एल-आर्जिनायन असते, जे नायट्रिक ऑक्साइडमध्ये बदलतं. नायट्रिक ऑक्साइड रक्तवाहिन्यांना शांत करण्यास मदत करतं. 

3- ओटमील-
तुमचा खराब मूड चांगला करण्यासाठी तुम्ही आहारात ओटमीलचा वापर नक्की करा. ओट्समध्ये सगळ्यात जास्च कार्बोहायड्रेट असतात. त्यामुळे शरीरात सेरोटिन मिळतं. सेरोटिन मूड चांगला करण्याचं काम करतं. मनाला शांती व आराम मिळतो. ओट्समध्ये असलेल्या फायबरमुळे शरीरातील कॅलेरीज न वाढता पोट भरलेलं वाटतं. 

4- ब्लूबेरी- 
स्ट्रेस घासविण्यासाठी ब्लूबेरीचा समावेश आहारात आवर्जून करा. ब्लूबेरीमध्ये योग्य प्रमाणात अॅन्टीऑक्सिडेंट असतं जे त्वचेतील कॉलेजनला व्यवस्थित ठेवतं. ब्लूबेरीतील पोटॅशियम ब्लड प्रेशर संतुलित ठेवण्यात मदत करतो त्यामुळे सोप्या पद्धतीने स्ट्रेस रिलीज होतं. 

5- ताजे मासे- 

आठवड्यातील काही दिवस ताजे मासे खाल्ल्याने मन शांत राहतं. माश्यांमध्ये असणारं आमेगा 3 फॅटी अॅसिड तणावाशी लढण्याची क्षमता वाढवतं. तसंच त्वचेला मऊ व तजेलदार बनवतं. 

Web Title: eat these food items to stay away from depression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.